Meat Production : यावर्षी देशात मांस उत्पादनात (Meat Production) मोठी वाढ होणार आहे. यंदा देशात मांस उत्पादनात 7 लाख टनांनी वाढ होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मांस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळं यंदा देशातून मोठ्या प्रमाणात मांस निर्यात (Meat Export) केलं जाणार आहे. मांसाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादनाताही वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे.


 मांस उत्पादनात पोल्ट्रीचा वाटा सर्वात जास्त 


देशात मांस उत्पादनात पोल्ट्रीचा वाटा सर्वात जास्त आहे, तर म्हशीचे मांस दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
त्यानंतर शेळ्या-मेंढ्या याचा क्रमांक लागतो. देशातून शेळ्या-मेंढ्याच्या मांसासह म्हशीच्या मांसाची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मागील दोन वर्षाचा विचार केला तर देशात मांस उत्पादन सात लाख टनांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.  केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. 


मांस खाणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी म्हशीच्या मांस निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मांस उत्पादन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढती मांसाची मागणी. गेल्या काही वर्षापासून मांस खाणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं मांसाच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. पशुसंवर्धन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 मध्ये मांसाचे 97.7 लाख टन उत्पादन झाले होते. यातील सर्वाधीक वाटा हा पोल्ट्री उद्योगाचा होता. पोल्ट्रीटा वाटा हा 51.14 टक्के होता. तर म्हशीच्या मांसाचा वाटा हा 17.61 टक्के, शेळ्या 14.47 टक्के, मेंढ्या 10.51 टक्के होता. दरम्यान, पशुसंवर्धन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2023-24 मध्ये देशातील मांस उत्पादन 14 दशलक्ष टनांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.   


कोणत्या राज्यात उत्पादनात वाढ होऊ शकते? 


पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 मध्ये पाच राज्यात सर्वाधिक मांस उत्पादन वाढू शकते. 2022-23 मध्ये पाच राज्यात 57.90 टक्के उत्पादन झाले होते. आता यावर्षी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यामध्ये उत्पादन वाढू शकते. या पाच राज्यात 60.27 उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेश 13.14 लाख टन, पश्चिम बंगालमध्ये 12.85 लाख टन, महाराष्ट्र 11.65 लाख टन, आंध्र प्रदेश 11 लाख टन आणि तेलंगणात 11.72 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागानं वर्तवला आहे. 


महत्वाच्या बातम्या: 


BMC : गोवंडीत अनधिकृतपणे विक्री केले जाणारे 4 हजार किलो मांस जप्त, उघड्यावरील पदार्थ सेवन न करण्याचं महापालिकेचं आवाहन