Mark zuckerberg : जगातील श्रीमंत लोकांच्या (Richest people) संपत्तीत सातत्यानं उलथापालथ होत आहे. श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीत सातत्यानं वाढ होत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत, तर गरिब अधिकच गरीब होत आहे. अशातच 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावणाऱ्यांच्या संदर्भात हुरुन ग्लोबल रिच लिस्ट (Hurun Global Rich List)  प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये मार्क झुकरबर्गने (Mark zuckerberg) सर्वांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. मार्क झुकरबर्गने 2024 मध्ये सर्वात जास्त संपत्ती मिळवली आहे. 


मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2024 मध्ये जगात सर्वात जास्त संपत्ती कमावणाऱ्यांच्या यादी तमार्क झुकरबर्ग पहिल्या स्थानावर आहे. मेटाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. शेअर्सची किंमत दुपटीहून अधिक वाढली आहे. मार्क झुकरबर्ग जरी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नसला तरी 2024 मध्ये त्याने प्रचंड संपत्ती मिळवली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये याबाबतची सविस्तर माहिती दिलीय. दरम्यान, लॉरेलच्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स आणि हर्मीसच्या बर्ट्रांड पुच यांना सर्वात मोठा फटका बसलाय. जाणून घेऊयात  जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कोण कितव्या स्थानावर.


एलन मस्क


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत एलन मस्कने पहिला क्रमांक मिळवलाय. मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती ही 231 अब्ज डॉलर आहे. मस्क गेल्या 4 वर्षात तीनवेळा पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2024 मध्ये मस्कने मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली आहे. 


जेफ बेझोस 


एलन मस्कनंतर जेफ बेझोस यांचा संपत्तीच्या बाबतीत जगात क्रमांक लागतो. जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत. हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ॲमेझॉनच्या क्लाउड कॉम्प्युटिंग या कंपनीनं चांगली कामगिरी केलीय. त्यामुळं जेफ बेझोस यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 57 टक्क्यांची वाढ झालीय.


बर्नार्ड अरनॉल्ट 


जगात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांच्या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट हे तिसऱ्या स्थानावर आहेत.  
त्यांच्या संपत्तीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, सध्या ते तिसऱ्या स्थानावर गेले आहे. त्यंची एकूण संपत्ती ही  175 अब्ज डॉलर आहे. 


 मार्क झुकरबर्गने


जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत  मार्क झुकरबर्गचा चौथा क्रमांक लागतो. झुकरबर्गची एकूण संपत्ती ही 158 अब्ज डॉलर आहे. त्यांच्या संपत्तीत यावर्ष दुपटीनं वाढ झालीय. 2024 मध्ये झुकरबर्ग यांच्या संपत्तीत जगात सर्वात जास्त वाढ झाली आहे.  


लॅरी एलिसन 


लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलिसन यांची एकूण संपत्ती ही  144 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यांच्या संपत्तीत सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


वॉरेन बफेट 


वॉरेन बफेट यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. बफेट हे प्रसिद्ध मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती  ही 144 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.


स्टीव्ह बाल्मर


स्टीव्ह बाल्मर यांची संपत्तीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सातव्या स्थानी आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 143 अब्ज डॉलर आहे. ते मायक्रोसॉफ्टचे माजी CEO आहेत. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 41 टक्क्यांची वाढ झालीय. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही त्यांची संपत्ती वाढवण्याचे मूळ कारण आहे. 


बिल गेट्स


बिल गेट्स हे देखील जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. ते जगाती आठव्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 2024 मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही 25 क्क्यांनी वाढली आहे.  बिल गेट्स यांची एकूण संपत्ती ही 138 अब्ज डॉलर आहे. 


लॅरी पेज


लॅरी पेज हे जगातील नवव्या व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही  123 अब्ज डॉलर आहे. 2024 मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीत  64 टक्क्यांची वाढ झालीय. 


महत्वाच्या बातम्या:


जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी कोण? शेकडो गाड्या विमानांसह अलिशान घरं, संपत्ती पाहून व्हाल थक्क