मुंबई : Mamata Machinery IPO Listing:भारतीय शेअर बाजारात आज एकूण 6 आयपीओ लिस्ट झाले. यामध्ये सर्वाधिक परतावा ममता मिशनरी आयपीओनं दिला. ममता आयपीओच्या शेअरला लिस्टींग होताच अप्पर सर्किट लागलं असून सध्या शेअर 630 रुपयांवर पोहोचला आहे. आज पाच मेनबोर्ड आयपीओ लिस्ट झाले या सर्व आयपीओंनी दमदार परतावा दिला. ममता मशिनरीनं गुंतवणूकदारांना एका शेअरमागं 387 रुपयांचा परतावा दिला आहे. म्हणजेच जवळपास गुंतवणूकदारांना 159 टक्के परतावा मिळाला आहे. 


ममता मशिनरीनं आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करताना 243 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. आयपीओ तब्बल 147 प्रीमियमसह 600 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्ट होताच या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आणि स्टॉकमध्ये 5 टक्के वाढ होताच अप्पर सर्किट लागलं होतं. सध्या ममता मशिनरीचा शेअर 630 रुपयांवर आहे. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट झाला त्यांना जवळपास 160 टक्के परतावा मिळाला आहे. 


ममता मशिनरीनं आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारातून 179.39 कोटींच्या उभारणी केली होती. या आयपीओत 0.74  कोटी रुपये ऑफर फॉर सेलद्वारे उभारले गेले. कंपनीनं आयपीओ 19 डिसेंबर ते 23 डिसेंबरमध्ये आणला होता. 27 डिसेंबर म्हणजे आज ज्यांना आयपीओ लागला त्यांना शेअर अलॉट करण्यात आले. या आयपीओचा किंमतपट्टा 230-243 रुपयांदरम्यान होता.कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर 12 रुपयांची सूट दिली होती.  


ममता मिशनरीचा आयपीओ 195 पट सबस्क्राइब झाला होता. ज्यामध्ये संस्थात्मक गुंतवणकादांकडून 235.88 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 274 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी138 पट सबस्क्राइब केला होता.  


ममता मशिनरी लिमिटेडची स्थापना 1979 मध्ये झाली होती. कंपनी प्लास्टिक बॅग्ज, पाउच, पॅकेजिंग,  एक्सट्रूजन इक्विपमेंटच्या मशिनची निर्मिती करते.  एफएमसीजी, फूड आणि ब्रेवरेज कंपन्यांना ममता मशिनरी सेवा पुरवते. 31 मे 2024 पर्यंत कंपनीनं 75 देशांमध्ये निर्यात केली होती. 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 210 कोटी रुपये होता. त्यांचा निव्वळ नफा 22.51 कोटी रुपये होता. 2023-24 मध्ये 241.31 कोटी महसूल होता तर फायदा 36.13 कोटी रुपये होता.


इतर बातम्या : 



 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)