Lok Sabha Richest Candidate: देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज देशात पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. या पहिल्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पहिल्या टप्प्यात भाजपसह (Bjp) काँग्रेसचे (Congress) अनेक मात्तबर नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, यावेळी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी 28 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत. जाणून घेऊयात या करोडपती असणाऱ्या 10 उमेदवारांबद्दल सविस्तर माहिती.   


पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्यातील 102 जागांवर मतदान प्रक्रिया आज पार पडत आहेत. या 102 जागांसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जवळपास 1625 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी 450 उमेदवार हे करोडपती आहेत. या करोडपती असणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. 


करोडपती असणारे 10 उमेदवार कोणते?


नकुल नाथ 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, त्यांची संपत्ती किती असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर नकुल नाथ यांची एकूण संपत्ती ही 716 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात याबाबतची माहिती देण्यात आलीय. 


अशोक कुमार 


सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत दुसरे नाव हे अशोक कुमार यंचे ते आहे. ते तामिळनाडूच्या इरोड लोकसभा मतदारसंघातून AIADMK कडून निवडणूक लढवत आहेत. त्यांची एतूण संपत्ती ही 662 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.  


देवनाथन यादव टी 


भाजपचे उमेदवार देवनाथन यादव टी यांचा श्रीमंत उमेदवारांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. ते तामिळनाडू राज्यातील शिवगंगई येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 304 कोटी रुपये आहे. 


माला राज्य लक्ष्मी शाह


माला राज्य लक्ष्मी शाह यांचा श्रीमंत उमेदवारांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. त्या उत्तराखंडच्या टिहरी गढवाल लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. माला राज्य लक्ष्मी शाह यांची एकूण संपत्ती ही 206 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


माजिद अली 


माजिद अली हे श्रीमंत उमेदवारांच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहेत. हे बहुजन समाज पार्टीकडून उत्तर प्रदेशातील सहारनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती ही 159 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे.


एसी शनमुगम 


AIADMK पक्षाचे उमेदवार एसी शनमुगम हे सर्वात श्रीमंत उमेदवारापैकी एक आहेत. श्रीमंतीच्या बाबतीत त्यांचा क्रमांक हा सहावा लागतो. ते तमिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  त्यांची एकूण संपत्ती ही 152 कोटी आहे. 


जयप्रकाश व्ही (कृष्णगिरी- AIADMK)


AIADMK चे उमेदवार जयप्रकाश व्ही यांचा देशातील सर्वात श्रीमंत आमदारांमध्ये सातवा क्रमांक लागतो. ते तामिळनाडूच्या कृष्णगिरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 135 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 


व्हिन्सेंट एच पाला 


काँग्रेसचे उमेदवार व्हिन्सेंट एच पाला यांचा देखील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत समावेश झाला आहे. ते श्रीमंत उमेदवारांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. मेघालयातील शिलाँग (एसटी) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 125 कोटी रुपये आहे. 


ज्योती मिर्धा 


ज्योती मिर्धा या भाजपच्या उमेदवार आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 102 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ज्योती मिर्धा राजस्थानच्या नागौरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


किर्ती चिदंबरम 


किर्ती चिदंबरम हे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 96 कोटी रुपयाहून अधिक आहे. ते तामिळनाडूतील शिवगंगाई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.  2019 साली देखील किर्ती चिदंबरम याच जागेवरुन निवडून आले होते. 


महत्वाच्या बातम्या:


'श्रीमंत' शाहू छत्रपती अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही ; निवडणुकांमुळे समोर आली संपत्तीची माहिती