LIC Profit : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे (LIC) मोठी घोडदौड घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 5 दिवसात LIC च्या भाग भांडवलात तब्बल 60,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर, देशातील सर्वात मोठी खासगी कर्ज देणारी एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 39500 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गेल्या 5 दिवसांत देशातील 9 प्रमुख कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये 35,800 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 2.30 लाख कोटी रुपयांची वाढ 


देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 2.30 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. इन्फोसिस ही एकमेव कंपनी आहे जिच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत, BSE चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 685.68 अंकांनी वाढला आहे आणि NSE निफ्टी 223.85 अंकांनी वाढला आहे.


कोणत्या कंपनीचे मार्केट कॅप किती वाढले?


देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) चे मूल्यांकन 60,656.72 कोटी रुपयांनी वाढून 6,23,202.02 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


देशातील सर्वात मोठ्या खासगी कर्जदार एचडीएफसी बँकेने 39,513.97 कोटी रुपयांची भर घातली आणि त्याचे मार्केट कॅप 13,73,932.11 कोटी रुपये झाले.


देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 35,860.79 कोटी रुपयांनी वाढून 17,48,991.54 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


देशातील सर्वात मोठी सूचीबद्ध टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे मार्केट कॅप 32,657.06 कोटी रुपयांनी वाढून 9,26,725.90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


देशातील सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 20,482 कोटी रुपयांनी वाढून 7,48,775.62 कोटी रुपये झाले आहे.


त्याच वेळी, देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी ICICI बँकेचे मूल्यांकन 15,858.02 कोटी रुपयांनी वाढून 9,17,724.24 कोटी रुपये झाले.


देशातील सर्वात मोठी MFCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरचे मूल्यांकन 11,947.67 कोटी रुपयांनी वाढून 5,86,516.72 कोटी रुपये झाले आहे.


देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्यांकन 10,058.28 कोटी रुपयांनी वाढून 15,46,207.79 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


देशातील सर्वात मोठ्या FMGC कंपन्यांपैकी एक असलेल्या ITC चा एमकॅप 2,555.35 कोटी रुपयांनी वाढून 5,96,828.28 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे मार्केट कॅप 18,477.5 कोटी रुपयांनी घसरून 7,71,674.33 कोटी रुपयांवर आले.


शेअर बाजारात तेजी


गेल्या आठवड्यात म्हणजेच शेवटच्या 5 दिवसांमध्ये शेअर बाजारात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 685.68 अंकांच्या वाढीसह 79,802.79 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 759.05 अंकांनी वाढला होता. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 223.85 अंकांच्या किंवा 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 24,131.10 अंकांवर बंद झाला. तर शुक्रवारी निफ्टीत 216.95 अंकांची वाढ झाली होती.