LIC IPO updates  :  शेअर बाजारात एलआयसीच्या आयपीओची अनेकांना प्रतिक्षा आहे. LIC च्या IPO ची तारीख अद्याप ठरलेली नाही, परंतु मार्च 2022 पर्यंत हा आयपीओ बाजारात येईल आणि आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत शेअर बाजारात सूचीबद्ध होईल अशी दाट शक्यता आहे. तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक आहात आणि आयपीओसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला सर्वात आधी काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. 


पॅन कार्ड अपडेट करा


एलसीआयने पॉलिसीधारकांसाठी पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. याचा फायदा त्यांना आयपीओच्या वेळी मिळणार आहे.  LIC पॉलिसीधारकांना कर्मचाऱ्यांच्या समकक्ष ठेवण्यासाठी कायद्यात सुधारणाही करण्यात आली. आता त्यामुळे 10 टक्के सवलतीवर फ्लोटचा 10 टक्के भाग मिळू शकतो. एलआयसी पॉलिसीधारकांनी  आपला पॅन क्रमांक एलआयसी पॉलिसीसोबत लिंक करण्याचे आवाहन एलआयसीने केले आहे.



डिमॅट अकाउंट आहे का?


शेअर बाजारात आयपीओ अर्ज करण्यासाठी, शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंटची आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करावे लागेल. डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी तुम्हाला डिपॉजिटिरी पॉर्टिसिपेंटची (DP) निवड करावी लागेल. DP हे एखादी ब्रोकरेज संस्था, बँक असू शकते. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही डिमॅट अकाउंट सुरू करता. त्यासाठी पॅन कार्ड, निवासस्थानाचा पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो आदी कागदपत्रे लागतील. प्रत्येक ब्रोकरेज संस्थांचे कमिशन, व्यवहारावरील दर वेगवेगळे असतात. तुम्हाला डिमॅट अकाउंट KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 


या दोन मुख्य बाबी असल्याशिवाय पॉलिसीधारकांसाठी असलेल्या राखीव आयपीओत तुम्हाला अर्ज करता येणार नाही. अधिक माहितीसाठी https://eterm.licindia.in/eServices/ipo_cell_notice वर उपलब्ध आहे. या लिंकवर पॅनकार्ड लिंक करता येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: