आधार-पॅन लिंक Adhar Pan Card Link
30 जूनपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार-पॅन लिंकची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही दोन कागदपत्रे लिंक न केल्यास आयकर विवरणपत्र भरता येणार नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी 30 जून रोजी आधार-पॅन लिंक करावे. याआधी एक हजार रुपयांच्या दंडासह आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च होती. त्यानंतर ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे आता, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शुक्रवारी शेवटची मुदत असू शकते. त्यानंतर दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे.
बँक लॉकर करार Bank Locker Agreement
तुम्ही बँक लॉकरबाबतचा करार 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जमा केला असेल, तर तुम्हाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची आग किंवा चोरी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत आरबीआयने नवीन धोरण तयार केले आहे. ग्राहकांनी लॉकर करारावर स्वाक्षरी केली नाही तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेशी संबंधित नवीन नियम लागू होणार नाहीत.
अॅडव्हान्स टॅक्स Advance Tax
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करत असाल. जर तुमचा कर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी तो विहित मुदतीत भरणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वेळेत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर तुम्हाला पहिल्या तीन हप्त्यांवर 3 टक्के आणि शेवटच्या हप्त्यावर एक टक्का दराने एकूण अॅडव्हान्स कर रकमेवर व्याज द्यावे लागणार आहे.