Johnson and Johnson Baby Talc : जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचं उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील विक्री बंद करणार आहे. अनेक महिला आणि लहान मुलं बेबी पावडरचा वापर करतात. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे, असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात अनेक खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. यामुळे आरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवरील आरोपांमुळे या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे. जागतिक स्तरावर व्यसायाचा विचार करता कंपनीनं 2023 पर्यंत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पोर्टफोलिओ मुल्यांकनानंतर हा निर्णय घेतला आहे. यामध्ये भौगोलिक प्रदेश, उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला जातो. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर 2020 मध्ये बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचं उत्पादन हटवलं.
कंपनीकडून आरोपांचं खंडनदरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आरोपाचं वारंवार आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर् घटक सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
कंपनीनं दिला 200 कोटी डॉलरचा दंडअमेरिकन न्यायालयात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात 22 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये न्यायालयानं कंपनीविरोधात निकाल देत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दंड ठोठावला होता. यामध्ये कंपनीला 200 कोटी डॉलरचा दंड द्यावा लागला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- FD Rates Hikes : 'या' दोन खाजगी बँकांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! FD च्या व्याजदरात वाढ, चेक करा लेटेस्ट रेट्स
- Airfare Likely To Rise: विमान प्रवास होणार महाग? 31 ऑगस्ट 2022 पासून विमान कंपन्या ठरवणार भाडे!
- Piyush Goyal : आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून जगाचं भारताकडं लक्ष, विकसित देश व्यापार करार करण्यास उत्सुक : पियूष गोयल