Jobs : 2023 मध्ये व्हाईट कॉलर जॉबमध्ये (Job) घट झाली आहे. ऑनलाइन जॉब प्लॅटफॉर्म Naukri.com ने देशातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांबाबतचा डेटा गोळा केला आहे. त्यानुसार, 2023 मध्ये भारतात व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांची घट झाली आहे. आयटी, रिटेल, बीपीओ, शिक्षण, एफएमसीजी, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात नोकऱ्या कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


जागतिक आर्थिक संकट आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळं व्हाईट कॉलर नोकऱ्यांची संख्या घटली आहे. यामध्ये जागतिक अनिश्चितता असूनही पायाभूत सुविधा, तेल आणि वायू, रिअल इस्टेट, वीज, प्रवास इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. त्याचा परिणाम हायरिंगच्या आकडेवारीवर दिसून येत आहे. 2023 मध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये कमी भरती केली आहे.


2024 मध्ये परिस्थिती कशी असेल?


व्हाईट कॉलर नोकऱ्यांबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. परंतू, कंपन्या अत्यंत सावधगिरीनेच नवीन भरती करतील. यासह, कमी भरती, चांगली व्यवसाय वाढ आणि जीडीपीच्या आकडेवारीमुळे कौशल्याची कमतरता 2023 मध्ये देशात व्हाईट कॉलर नोकर्‍यांच्या संख्येत वाढ होईल. BFSI आणि FMCG कंपन्यांमध्ये नियुक्ती प्रक्रियेत अधिक सावधगिरी बाळगली जाईल.


आयटी क्षेत्राची स्थिती कशी असेल?


Naukri.com च्या आकडेवारीनुसार, 2023 हे वर्ष आयटी क्षेत्रासाठी फारसे चांगले ठरले नाही. कारण यावर्षी भरतीमध्ये 29 टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. तर 2022 मध्ये आयटी क्षेत्रातील नोकरभरतीत 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. या डेटामध्ये कॅम्पस प्लेसमेंट, गिग हायरिंग यासारख्या भर्तींचा समावेश केलेला नाही.


2024 मध्ये या क्षेत्रांमध्ये अधिक नोकऱ्यांची अपेक्षा


Naukri.com च्या माहितीनुसार, नवीन वर्षात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट होऊ शकते, तर विमान वाहतूक, दूरसंचार, लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. दिल्ली/एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे नवीन भरतीमध्ये घट दिसून आली आहे, तर अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूरमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती, 250 पदांवर भरती; अर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे काही दिवस