मुंबई - सणासुदीच्या मोसमाचा आरंभ झाल्या-झाल्या भारतातील बँकिंग (Bank), फायनॅन्स सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र ग्राहकांचे वाढते व्यवहार आणि देवाण-घेवाण यांच्या व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे. या धामधुमीच्या कालावधीत योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक संस्था डिजिटल बँकिंग (Digital) संचालन वाढवण्यावर आणि उत्तम ग्राहक सेवा प्रदान करू शकेल असे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. टीमलीझ सर्व्हिसेस या अग्रगण्य स्टाफिंग समूहानुसार बीएफएसआय क्षेत्रात रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे, विशेषतः रिटेल लेंडिंग, मायक्रोफायनॅन्स संस्था (एमएफआय) आणि पेमेंट सेवांमध्ये ही वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांत वैयक्तिक तसेच दुचाकी आणि चार-चाकी वाहन कर्जांची मागणी 12% नी वाढली आहे. ही मागणी सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या खरेदीच्या मोसमाने प्रेरित आहे. त्याचा थेट परिणाम रिटेल लेंडिंग आणि एमएफआय क्षेत्रातील रोजगार संधींवर होईल आणि जुलैपासून नोव्हेंबर 2024 पर्यंत ही वाढ 120,000 वरून 19,000 वर पोहोचेल. एमएफआय सेवांची मागणी 25% ने वाढेल, ज्यावरून आर्थिक समावेशकता आणि स्मॉल स्केल लेंडिंगवरील या क्षेत्राचा फोकस स्पष्ट दिसून येतो.


शिवाय, पेमेंट सर्व्हिसेसमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण 41 %नी वाढेल, तर क्रेडिट कार्ड सेगमेन्टमध्ये रोजगार संधी 32 %नी वाढतील असे अनुमान आहे. ही वाढ सणासुदीच्या मोसमात डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सचा वाढता वापर आणि क्रेडिट ऑफरिंगने प्रेरित आहे. या उत्सवाचा मोसमादरम्यान बजारपेठेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक संस्था केवळ आपले मनुष्यबळ वाढवीत नाही आहेत, तर वर्तमान कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहेत. टीमलीझ सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कृष्णेंदू चटर्जी म्हणाले, “सणासुदीच्या काळात बीएफएसआय उद्योगांवर कामाचा मोठा ताण असतो, पण या वर्षी कुशल कर्मचाऱ्यांच्या मागणीत असामान्य वाढ दिसून येत आहे. रिटेल लेंडिंगपासून ते पेमेंट सर्व्हिसेसपर्यंत हे क्षेत्र झपाट्याने बदलते आहे आणि आमचा डेटा दर्शवितो की, या महत्त्वाच्या काळात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कंपन्या आपले मनुष्यबळ वाढवून आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून सद्य परिस्थितीला प्रतिसाद देत आहेत.”


टीमलीझ सर्व्हिसेसचा डेटा दर्शवितो की बीएफएसआय क्षेत्र मार्केटमधील बदल आणि ग्राहकांच्या अपेक्षा यांच्याशी कसे जुळवून घेते. डिजिटल इनोव्हेशन आणि ग्राहक-केंद्रित सेवांवर भर देऊन आर्थिक संस्था वाढत्या व्यवहारांचा सामना करण्यास आणि उत्तम प्रकारे तयारी करून सज्ज असलेल्या मनुष्यबळामार्फत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यास सज्ज आहेत.


हेही वाचा


एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स