Deloitte Layoff: डेलॉईट (Deloitte Layoff) कंपनीनं कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. या कंपनीतून अशाच एका 24 वर्षीय मुलीला देखील काढून टाकण्यात आलं आहे. या मुलीला वर्षाला 76 लाखांचा पगार होता. मात्र, एवढी मोठी नोकरी (Job) जाऊन देखील ती मुलगी आनंदी आहे.  सिएरा देसमराट्टी असं या मुलीचं नाव आहे. 


एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत महिन्याला लाखो पगाराची नोकरी मिळवणं हे बहुतेक लोकांसाठी 'ड्रीम जॉब' असते. प्रत्येकाला अशी नोकरी मिळू शकत नाही. ज्यांना ती मिळते ते आधी काम मिळवण्यासाठी आणि नंतर टिकवण्यासाठी मेहनत करतात. जर तुम्हाला अशी नोकरी मिळाली आणि नंतर कंपनीने तुम्हाला काढून टाकले तर तुम्हाला नक्कीच दुःख होईल. सिएरा देसमराट्टी नावाच्या 24 वर्षांच्या मुलीला अशीच मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती. तिला वर्षाला 76 लाख रुपये पगार मिळत होता. मात्र एके दिवशी अचानक HR ने त्याला सांगितले की तिची नोकरी गेली आहे. या गोष्ट एकूण सिएरा खूप आनंदी आहे. ती म्हणते की, आयुष्यात यापेक्षा चांगलं काहीच घडलं नसतं. 


नोकरी गेल्यानंतर सिएरा आनंदी झाली कारण...


सिएरा टॉप ग्लोबल कन्सल्टिंग फर्म डेलॉइटमध्ये विश्लेषक म्हणून काम करत होती. त्यांचे कार्यालय अमेरिकेतील शिकागो शहरात होते. डेलॉइटमधील नोकरी ही सिएरासाठी स्वप्नवत नोकरी नव्हती, परंतु त्या बदल्यात तिला 90 हजार डॉलर्स मिळत होते, जे भारतीय चलनात अंदाजे 76 लाख रुपये मिळत होते. मात्र, नोकरी गेल्यानंतर सिएरा खूप आनंदी आहे. कारण  डेलॉइटची वेगवान कार्यपद्धतीत मला फारसे चांगली वाटत नव्हती. मला असे वाटायचे की माझ्या सहकाऱ्यांशी जुळण्यासाठी मला माझे व्यक्तिमत्वात बदल करावा लागेल. त्यामुळं या कामावरुन मला कमी केलं ही चांगली गोष्ट असल्याचं तिने सांगितले.


कामाच्या दबावामुळं मानसिक आणि आरोग्यविषय त्रास


सिएरा ही अल्प उत्पन्न कुटुंबातील आहे. डेलॉइटमधील सर्व सहकारी सूट, जॅकेट आणि डिझायनर ड्रेसमध्ये यायचे. ही जागा आपल्यासाठी नाही असे तिला वाटत होते. तिथं 11-11 तास काम करावे लागत होते. कार्यसंस्कृती आणि दबावामुळे ती मानसिक आणि शारीरिक आजारी पडू लागली. 


तणावपूर्ण कार्यसंस्कृतीपासून दिलासा


दरम्यान, नोकरीतून काढून टाकल्यानंतर सिएरानं सांगितलं की मला तणावपूर्ण कार्यसंस्कृतीपासून दिलासा मिळाला आहे. आता पुढे मला काही काळ संघर्ष करावा लागला.  नवीन नोकरी शोधण्यासाठी त्याला 2 महिने लागले. आता ती अमेरिकामध्ये एक्चुरियल विश्लेषक म्हणून काम करत आहे. ती घरातूनच काम करते.  या काममुळं ती आता काम आणि आयुष्य यात समतोल साधत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ