Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ लागत आहेत. दरम्यान, दिल्लीत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली आहे. 


सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. एका दिवसापूर्वी सोन्याच्या दरात 600 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली आहे. अहवालानुसार, अमेरिकेत महागाईची आकडेवारी आली आहे. अमेरिकेतील चलनवाढीचा दर फेब्रुवारी 2021 मध्ये म्हणजे जवळपास 50 महिन्यांनंतर सर्वात कमी झाला आहे. मात्र, अमेरिकन चलनवाढीचा दर सलग 5 व्या महिन्यात घसरला आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर देखील झाला आहे. 


येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता


ऑगस्टमध्ये महागाईचा आकडा 2.5 टक्क्यांवर आला आहे. तर जुलै महिन्यात महागाईचा आकडा 2.9 टक्के होता. आता फेडरल रिझर्व्हला व्याजदरात कपात करणे खूप सोपे होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आता फेडला व्याजदरात 0.25 टक्क्यांहून अधिक कपात करणे सोपे होणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


दिल्लीत सोन्याच्या दराला मोठी झळाळी


देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. स्थानिक ज्वेलर्सची वाढलेली खरेदी आणि जागतिक बाजारातून मिळालेले मजबूत संकेत यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 500 रुपयांनी वाढून 74,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बुधवारी चांदीचा भावही 500 रुपयांनी वाढून 85,000 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सत्रात चांदी 84,500 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.


दोन दिवसात दरात मोठी वाढ


मंगळवार आणि बुधवारची वाढ गृहीत धरली तर दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ दिसून आली. दुसरीकडे, चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीच्या दरात 700 रुपयांची वाढ दिसून आली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी वाढलेल्या खरेदीमुळे बाजारातील भावना मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली.


महत्वाच्या बातम्या:


Gold Silver Price: सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका, सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर?