DGCA allows Jet Airways to take off again : कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे मागील तीन वर्षे बंद असणारी जेट एअरवेज (Jet Airways Airline) कंपनीची विमानं आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.


वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी मागील बराच काळापासून प्रयत्न सुरु होते. कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता कंपनी लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. त्याआधी मागील महिनाभरापासून सराव उड्डाणे सुरु होती. 15 आणि 17 मे रोजी प्रोव्हाईडिंग फ्लाईट्सही कंपनीकडून उडवण्यात आल्या. ज्यात हवाई वाहतूक संचालनालयाचे अधिकारी होते. त्यांच्या पर्यवेक्षणानंतर आता एअर ऑपरेटर सर्टीफिकेट (Air Operator Certificate) कंपनीला देण्यात आलं आहे. ज्यामुळे आता कंपनी लवकरच सर्व नागरिकांसाठी विमानसेवा सुरु करणार आहे.


'नवनवीन सेवा पुरवण्यासाठी अधिक प्रयत्न करु'


कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान (Murari Lal Jalan) मीडियाशी बोलताना दिलेल्या माहितीत सांंगितले की, 'ही बातमी केवळ जेट एअरवेजसाठी नवी पहाट नसून संपूर्ण भारतीय विमानसेवेसाठी एक मोठी गोष्ट आहे. आम्ही भारताची एक लाडकी विमानसेवा पुन्हा सर्वांसाठी घेऊन येत आहोत. आम्ही सर्व ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असून नवनवीन सेवा पुरवण्यासाठीही प्रयत्न करु.'


संबंधित बातम्या :