Home Sales : घरांच्या किंमतीत (Home Sales Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीय. विशेष म्हणजे जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झालीय. तर 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊयात घर विक्रीच्या संदर्भातील सविस्तर माहिती. 


सहा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च घरांची विक्री 


नाइट फ्रँकच्या अहवालानुसार पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ झालीय. जानेवारी ते मार्च दरम्यान 86,345 घरांची विक्री झाली आहे. ही विक्री गेल्या सहा वर्षातील कोणत्याही तिमाहीतील दुसऱ्या क्रमांकाची विक्री आहे. याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत सर्वोच्च घरांची विक्री झाली होती.  


घरांची विक्री होण्यात कोणतं शहर आघाडीवर? 


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आठ शहरांमध्येच 86,345 घरांची विक्री झालीय. त्यापैकी, 23,743 घरांची विक्री एकट्या मुंबईत झालीय. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजे घर विक्रीच्या बाबतीत मुंबई शहर सर्व शहरांपेक्षा आघाडीवर आहे. दरम्यान, आठ शहरांमध्ये विक्री झालेल्या 86,345 घरांपैकी 40 टक्के घरं ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. विक्री झालेल्या एकूण घरांपैकी 34,895 घरांची किंमत ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती असं अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत 10 टक्क्यांची घट झालीय. घरांच्या वाढत्या किंमती आणि महागडी कर्ज यामुळं 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झालीय. 


कोणत्या शहरात सर्वात महागडी घरं?


जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीत घरांच्या विक्रीत मुंबई आघाडीवर आहे. मात्र, घरांच्या सर्वाधिक किंमती कोणत्या शहरात आहेत हे तुम्हाला माहितेय का? तर हैदराबाद या शहरात घरांच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. मागील वर्षीच्या तुलनेत हैदराबादमध्ये घरांच्या किंमतीत 13 टक्यांची वाढ झालीय. 


कोणत्या शहरात कित्ती टक्क्यांनी महाग झाली घरं?


मुंबई -   6 टक्क्यांची वाढ
बंगळुरु - 9 टक्क्यांची वाढ
एनसीआर -  5 टक्क्यांची वाढ
कोलकाता - 7 टक्क्यांची वाढ
पुणे  -          4 टक्क्यांची वाढ
 चेन्नई -        5 टक्क्यांची वाढ   


महत्वाच्या बातम्या:


Isha Ambani : अंबानींकडून मोठा सौदा! ईशा अंबानीने 500 कोटींमध्ये विकलं आपलं घर; 'या' हॉलिवूड स्टारने घेतलं विकत