ITR Filing Last Date : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2021 हीच असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून महसूल सचिव तरुण बजाज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या निर्णायानंतर आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की, 'आयकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही.' 31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र (IT Return) दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.
अधिकृत संकेतस्थळवर विवरणपत्र दाखल करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यावर निर्णय होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण केंद्र सरकारकडून स्पष्ट शब्दात कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. 31 डिसेंबर 2021 नंतर आयकर विवरणपत्र (IT Return) दाखल करणाऱ्यांना मात्र दंड भरावा लागणार आहे.
महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की, 'आयकर विवरणपत्र दाखल करण्याचं काम व्यवस्थित सुरु आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त रिटर्न फाईल करम्यात आले आहेत. त्याशिवाय यंदा 60 लाख अतिरिक्त रिटर्न दाखल झाला आहे.'
आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी वाट पाहणाऱ्यांना आता नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करण्याऐवजी इनकम टॅक्स रिटर्न भारण्याचं काम करावे लागेल. कारण आयटीआर न भरल्यास नव्या वर्षाचा उत्सव मावळेल, अन् दंडांला समोरं जावे लागेल. आयकर विवरणपत्र दाखल न केल्यास पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
टॅक्स भरताना कोणती काळजी घ्याल?
टॅक्सची अचूक माहिती द्या
आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो.
वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या
आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल.
अचूक बँक डिटेल्स
आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.