Pune City Police : पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचं नाव आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.


शिल्पा चव्हाण या पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहत होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  शिल्पा चव्हाण या शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रँचचा पदभार होता. आज सकाळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 


घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळावर हजर आहेत. शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शिल्पा चव्हाण यांची शांत आणि संयमी अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख होती. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच होत्या अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



संबधित बातम्या :


Narayan Rane : ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली; नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Sindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत मोठे उलटफेर! सतीश सावंत, राजन तेलींचा पराभव