IPO Opening This Week : शेअर बाजारात आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा महिना सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. कारण, बाजारात वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्या आपला आयपीओ लाँच करत आहेत. यामध्ये ट्रॅव्हल्स, रियल इस्टेटसोबतच फुटवेअर रिटेलर कंपन्यांच्या आयपीओचा समावेश असणार आहे. या वर्षात शेअर बाजारात इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून (IPO)अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यात. यातील काही आयपीओने गुंतवणुकदारांना मालामाल केले. तर काही कंपन्यांच्या आयपीओने सूचीबद्ध होताना फारसा परतावा दिला नव्हता. या आठवड्यातही काही आयपीओ येणार आहेत.
खालील आयपीओ या आठवड्यात येणार :
1. Rategain Travel
रेटगेन ट्रॅव्हल या कंपनीचा आयपीओ सात डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. तर 9 डिसेंबरपर्यंत रेटगेनच्या आयपीओमध्ये सबस्क्रिप्शन करता येणार आहे. रेटगेनची ब्रँड प्राइज 405 रुपये ते 425 रुपये प्रति शेयर आहे. या शेअर्सच्या माध्यमातून रेटगेन कंपनीला 1355 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. कंपनीकडून 35 शेअर्ससाठी 14,875 रुपयांचा एक लॉट ठरवण्यात आला आहे. कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट घेण्यासाठी अप्लाय करु शकतो.
2. Shriram Properties
दक्षिण भारतामधील रियल एस्टेट कंपनी Shriram Properties चा आईपीओ 8 डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. तर 10 डिसेंबरपर्यंत Shriram Properties च्या आयपीओमध्ये सबस्क्रिप्शन करता येणार आहे. Shriram Properties ची ब्रँड प्राइज 113 रुपये ते 118 रुपये प्रति शेयर आहे. शेअर्सच्या माध्यमातून ही कंपनीला 600 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. कंपनीने 125 शेअर्सचा लॉट केला असून याची किंमत 14,750 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कोणताही गुंतवणूकदार 13 लॉटपेक्षा जास्तसाठी अप्लाय करु शकत नाही.
3. MapmyIndia IPO
भारतामध्ये Advanced Digital Maps ची सुविधा उपलब्ध करणारी कंपनी C.E. Info म्हणजेच MapmyIndia चा आयपीओही याच आठवड्यात येणार आहे. MapmyIndia चा आयपीओ 9 डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. तर 13 डिसेंबरपर्यंत याचं सबस्क्रिप्शन करता येणार आहे. आयपीएच्या माध्यमातून 1040 कोटी रुपये जमवण्याची आशा कंपनीला आहे. C.E. Info ची बेस प्राइज 1,000 ते 1,033 रुपये प्रति शेयर ठरवण्यात आली आहे. C.E. Info कंपनीकडून 14 शेअर्ससाठी 14,462 रुपयांचा एक लॉट ठरवण्यात आला आहे. कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट घेण्यासाठी अप्लाय करु शकतो.
4. Metro Brands
Big Bull राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असेलेली मेट्रो ब्रांड्स (Metro Brands) कंपनीचा आयपीओ या आठवड्यातच येणार आहे. हा आयपीओ 10 डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. तर 14 डिसेंबरपर्यंत याचं सबस्क्रिप्शन करता येणार आहे. फुटवेअर क्षेत्रातील आघाडीची रिटेलर मेट्रो ब्रांड्स कंपनीला आईपीओच्या मार्फत 1370 कोटी रुपये जमा करण्याची आशा आहे. मेट्रो ब्रांड्स कंपनीची ब्रँड प्राइज 485 रुपये ते 500 रुपये प्रति शेयर आहे. कंपनीकडून 30 शेअर्ससाठी 15,000 रुपयांचा एक लॉट ठरवण्यात आला आहे. कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 1.95 लाख रुपयांचे 13 लॉट घेण्यासाठी अप्लाय करु शकतो.
मागील महिन्यातही 10 आयपीओ -
नोव्हेंबर महिन्यात 10 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले होते. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि टेगा इंडस्ट्रीजचे आयपीओ खुले आहेत. याच महिन्यात या कंपन्या बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. मागील महिन्यात पेटीएम कंपनी सूचीबद्ध झाली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे गुंतवणुकदारांना परतावा मिळाला नाही. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी लोअर सर्किट लागले होते.