Tata's Bigbasket IPO: भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन किराणा दुकान टाटा बिग बास्केट आगामी काळात आपला आयपीओ बाजारात आणू शकते. बिग बास्केट या ऑनलाइन किराणा दुकानाचं मूल्य 3.2 अब्ज डॉलर आहे आणि एवढ्या ताज्या भांडवल उभारणी नंतर टाटा समूहाची बिग बास्केट तीन वर्षांच्या आत आयपीओ बाजारात दाखल करणार अशी सूत्रांची माहिती आहे.
टाटांची बंगळुरू स्थित ई-कॉमर्स फर्म येत्या 24 ते 36 महिन्यांत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सुरू करेल अशी माहिती आहे. परंतु सार्वजनिक ऑफर सुरु करण्यापूर्वी कंपनी अधिक खाजगी भांडवल उभारण्यास तयार होती, असे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख यांनी एका मुलाखतीत सांगितले.
जवळबास 200 दशलक्ष डॉलर भांडवल असलेल्या बिगबास्केटने या आठवड्यात घोषित केले होते ते त्यांच्या जलद वाणिज्य शाखांना बळ देईल आणि देशव्यापी ओळख अधिक बळकट करणार आहे. कारण त्यांना Amazon.com Inc. आणि Reliance Industries Ltd सारख्या क्षेत्रातील दिग्गजांसोबत त्यांची स्पर्धा आहे. दरम्यान पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चपर्यंत सुमारे 200 ते 300 आउटलेट पर्यंत त्यांनी विस्तार केला आहे. शिवाय नवीन निधी तैनात करताना, भांडवल विस्तार आणि नवीन प्रदेशांमध्ये विपणन बिगबास्केट त्यांच्या स्टोअर्सची संख्या वाढवणार आहे. शिवाय त्यांच्याकडून सामानाची डिलिव्हरी अवघ्या 30 मिनिटांत करण्यात येईल अशी माहिती देखील पारेख यांनी दिली आहे.
बिगबास्केट सध्या 55 शहरांमध्ये कार्यरत आहे आणि त्याच कालावधीत 75 शहरांमध्ये विस्तार करू इच्छित आहे, असे पारेख म्हणाले. सुमारे 450 शहरांमध्ये या फर्मची उपस्थिती आहे आणि पुढील वर्षात ती 80 ते 100 पर्यंत वाढू शकते, असेही ते म्हणाले. भारतातील वैयक्तिक उपभोग खर्चातील सर्वात मोठा खर्च किराणा वस्तूंच्यामध्ये होतो.
Tata Sons Pvt Ltd च्या Tata Digital Ltd ने देशातील सर्वात मोठी ऑनलाइन किराणा कंपनी, अलिबाबा समर्थित बिगबास्केट मधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आहे. टाटा डिजिटल ही समूहाची होल्डिंग कंपनी, टाटा सन्सची 100 टक्के मालकीची उपकंपनी आहे. या करारामुळे टाटा समूहाचा रिटेल क्षेत्रातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही बातमी वाचा :