SBFC Finance: नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी SBFC फायनान्स लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये उभे करायचे आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (Draft Red Herring Prospectus) नुसार, या आयपीओ अंतर्गत 750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीच्या प्रवर्तक आणि भागधारकांद्वारे 850 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.


आयपीओशी (IPO) संबंधित तपशील


1) ऑफर-फॉर-सेलचा (OFS) भाग म्हणून Arpwood Partners Investment Advisors LLP द्वारे 398.19 कोटी आणि SBFC होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे 275 कोटी किमतीच्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे.


2) याविक्रीसह 97.72 कोटी रुपयांचे शेअर्स अर्पवुड कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि 79.08 कोटी रुपयांचे 845 सर्व्हिसेस एलएलपीद्वारे विकले जातील.


3) मसुद्याच्या कागदपत्रांच्यमध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनी 150 कोटी रुपयांच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करत असून, असे प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, आयपीओचा आकार कमी होईल.


4) व्यवसाय आणि मालमत्तेच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील भांडवली गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनी या आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर कंपनीचा भांडवली आधार वाढवण्यासाठी करणार असल्याची माहिती आहे.


4) आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे कंपनी इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. इक्विटी शेअर्स NSE आणि BSE वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.


कंपनीच्या व्यवसायबद्दल माहिती


SBFC फायनान्स कंपनीची (finance company) स्थापना वर्ष 2017 मध्ये झाली. कंपनी मालमत्तेवरील कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुरक्षित आणि सुवर्ण कर्ज यासारखे आर्थिक सुविधा प्रदान करते. कंपनी भारतातील उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांच्या मालकांना सेवा प्रदान करते. जून 2022 पर्यंत, SBFC फायनान्सचा व्यवसाय 16 भारतीय राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 104 शहरांमध्ये पसरलेला आहे आणि कंपनीच्या देशात 135 शाखा आहेत. मुंबईस्थित कंपनीला मलबार ग्रुप, क्लेरेमॉन्ट ग्रुप आणि अर्पवुड ग्रुप सारख्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने तिचे एकूण उत्पन्न 530.70 कोटी रुपये नोंदवले आणि 64.52 कोटी रुपयांचा करानंतरचा नफा (PAT) नोंदवला.