Bikaji Foods IPO Subscription: नोव्हेंबर महिन्यात बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ (Initial Public Offer) येणार आहेत. नमकीन खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स (Bikaji Foods IPO) या कंपनीनेदेखील आपला आयपीओ बाजारात आणला होता. सोमवारी या आयपीओसाठी बोली लावण्याचा शेवटचा दिवस होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ 26.67 पटीने सब्सक्राइब झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2.6 कोटींच्या शेअर्सच्या तुलनेत 55.04 कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली. 


कधी होणार शेअर्स अलॉटमेंट


बिकजी फूड्स कंपनी शेअर बाजारात 16 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध होणार आहे. त्याआधी आयपीओद्वारे शेअर्स अलॉटमेंट होणार आहे. आयपीओत यशस्वी बोली लागलेल्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत शेअर्स जमा होतील. जर, तुम्हाला आयपीओत शेअर्स मिळाले नसल्यास तुमच्या बँक खात्यात पैसे पुन्हा येतील. 


ग्रे मार्केट प्राइज किती (GMP Price)


बिकाजी फूड्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला. तर, दुसरीकडे ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या लिस्टिंगबाबत सकारात्मकता दिसून येत आहे. ग्रे मार्केटनुसार बिकाजी फूड्सची लिस्टिंग 40 रुपयांच्या प्रीमियमसह होण्याची शक्यता आहे. बिकाजी फूड्सने प्रति शेअरची किंमत 285 ते 300 रुपये निश्चित केली आहे. ग्रे मार्केटमधील कलानुसार, 'बिकाजी'ची लिस्टींग 340 रुपये प्रति शेअर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी GMP हा 27 रुपये होता. सोमवारी यात वाढ झाली. 


बिकाजी फूड्स कंपनी काय करते?


बिकाजी फूड्स लिमिटेड कंपनी 250 हून प्रकारची नमकिन तयार करते. उत्तर भारतापासून ते ईशान्य भारतातील राज्यांमधील बाजारपेठेत बिकाजी फूड्स प्रमुख कंपनी आहे. नमकिन शिवाय  पापड, फ्रोझन फूड आणि कुकीजदेखील ही कंपनी तयार करते. बिकाजीचे वितरणाचे जाळे विस्तारत असून एफएमसीजी सेक्टरमध्ये तेजीने वाढ होत आहे. 


या कंपन्यांच्या आयपीओकडे लक्ष


NBFC फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा IPO 9 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. या आयपीओ अंतर्गत 1,960 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) केली जाणार आहे.


आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजदेखील आयपीओ आणणार आहे.कंपनीने 1,462 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 386-407 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. 


केन्स टेक्नॉलॉजी या कंपनीचा आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. कंपनीने प्रति शेअर 559 ते  587 चा प्राइस बँड निश्चित केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: