NSE CASE: सीबीआयने एनसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) को-लोकेशन प्रकरणात चौकशी केली आणि चित्रा रामकृष्ण यांनी देश सोडून पळून जाऊ नये म्हणून लुकआउट परिपत्रकही जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच प्रकरणात एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण आणि माजी सीओओ आनंद सुब्रमण्यन यांच्या विरोधातही लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
आयकर विभागाचे छापे
याआधीही गुरुवारी आयकर विभागाने एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावरही छापा टाकला. हिमालयीन पर्वतरांगा मध्ये राहणाऱ्या योगींना माहितीची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सीबीआयकडून गुन्हा दाखल
केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.
तपासाची व्याप्ती वाढू शकते
रामकृष्ण यांच्या कार्यपद्धतीत आणि नैतिक आचरणात गंभीर त्रुटी असल्याचे सेबीला आढळून आले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सेबी व्यतिरिक्त सीबीआय, आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. एनएसईचे माजी सीओओ आनंद सुब्रमण्यम यांच्यावरही सेबीने कारवाई केली आहे. त्याच्यावर 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रा रामकृष्ण यांनाही ३ कोटींचा तर रवि नारायण यांना २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयकर विभागाच्या तपासाची व्याप्ती वाढू शकते. यामध्ये ईडी देखील सहभागी होऊ शकते.

संबंधित बातम्या:
- देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेत होते हिमालयातील योगीबाबा, सीईओ चित्रा रामकृष्ण अडकल्या वादात
- IT Raid : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड
- Tata Sons: टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांना पाच वर्षांची मुदतवाढ; कार्यकारी मंडळाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha