SBI : रविवारच्या दिवशी बॅंका बंद असल्यानं सर्वसामन्यांना त्यांची कामं पुढे ढकलावी लागतात. पण एसबीआय (SBI) बॅंकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे रविवारी एसबीआयच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवार असूनही उद्या एसबीआय बॅंकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. एसबीआय बॅंकने ट्वीट करत ग्राहकांना माहिती दिली आहे.
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने एलआयसी आयपीओसाठी (LIC IPO) हा मोठा निर्णय घेतला आहे. 4 मे पासून एलआयसी आयपीओ सुरू झाला आहे आणि 9 मे रोजी तो बंद होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी बँकेचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
एसबीआय बॅंकेने ट्वीट करत लिहिले आहे, एलआयसी आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या सोईसाठी एसबीआयच्या सर्व शाखा रविवारी 8 मे 2022 रोजी अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू राहतील.
एसबीआय बॅंकेसह पंजाब नॅशनल बॅंकदेखील या रविवारी ग्राहकांच्या सोईसाठी सुरू राहणार आहे. एसबीआयचा शेअर लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या