HDB IPO: एचडीएफसी बँकेची उप कंपनी HDB फायनान्शिअल सर्विसेसचा IPO 25 जून रोजी सुरू होत आहे. 12 हजार 500 कोटी रुपयांच्या या IPO मध्ये अँकर गुंतवणूकदार 24 जूनपर्यंत बोली लावू शकतील.  एचडीएफसी बँकेने जाहीर केलेल्या एक्सचेंज फायलिंग द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, IPO मध्ये 2500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स असतील. शिवाय एचडीएफसी बँकेकडून दहा हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलमध्ये केली जाणार आहे. एचडीबी या HDFCच्या उप कंपनीत एचडीएफसी बँकेचा 94.3% हिस्सा आहे. 

Continues below advertisement

मात्र, हा आयपीओ घेणाऱ्या गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांपर्यंत तोटा होण्याचा धोका असल्याचं सांगितलं जात आहे.  19 जून रोजी नव्याने दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रोस्पेक्टस (RHP) मध्ये करण्यात आलेल्या खुलाशानुसार, 19 जून 2025 पर्यंत 49 हजार 553 वैयक्तिक भागधारकांचा HDB फायनान्शियलमध्ये आधीच हिस्सा होता.  कंपनीच्या अनलिमिटेड टप्प्यात, त्यांनी 1200 ते 100350 रुपयांच्या श्रेणीतील शेअर्स खरेदी केले होते. आता ipo ची किंमत प्रति शेर 700 ते 740 रुपयांची आहे. त्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना 38 ते 48 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागू शकतो. 

कोट्यवधींचा धक्का बसणार

HDB Financial Services च्या IPO मुळे काही जुन्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा होऊ शकतो. 19 जून रोजी सादर केलेल्या RHP (Red Herring Prospectus) नुसार, कंपनीत आधीपासूनच 49,553 वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. त्यांनी कंपनीचे शेअर्स त्याच्या अनलिस्टेड टप्प्यात 1200 ते 1350 रुपयांदरम्यान घेतले होते. आता जेव्हा IPO ची किंमत फक्त 700 ते 740 रुपये दरम्यान आहे, तेव्हा या गुंतवणूकदारांना जवळपास 38% ते 48% पर्यंत नुकसान सहन करावं लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने जर 1250 रुपये दराने 1 कोटी शेअर्स घेतले असतील, तर त्याने एकूण 1250 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. पण जर IPO नंतर शेअरची किंमत 740 रुपये झाली, तर त्याची गुंतवणूक आता फक्त 740 कोटी रुपयांची राहील. म्हणजेच सुमारे 510 कोटी रुपयांचं नुकसान होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ज्यांनी शेअर्स जास्त दराने घेतले होते, त्यांना आता IPO दरामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Continues below advertisement

आयपीओमध्ये 2500 कोटींचा नवीन इश्यू 

HBD Financial Services चा IPO लवकरच येणार आहे. या IPO मध्ये ₹2500 कोटींचे नवीन शेअर्स विकले जातील. त्यासोबतच मूळ कंपनी HDFC Bank Limited आपले 13.51 कोटी जुने शेअर्स 'Offer For Sale' (OFS) अंतर्गत विकणार आहे. HDFC ने हे शेअर्स 46.4 रुपयांना घेतले होते. जर हा IPO ₹740 च्या वरच्या किमतीला बाजारात लिस्ट झाला, तर बँकेला सुमारे ₹9373 कोटींचा करपूर्व नफा होऊ शकतो.

हेही वाचा:

AI Cutdown Jobs Amazon: एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, सीईओंचा इशारा