हायड्रोकार्बन पाइपलाइन टाकणाऱ्या 'या' कंपनीचा आयपीओ लवकरच, जाणून घ्या कंपनीची माहिती

Corrtech International IPO: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा सातत्याने जागतिक बाजारांवर होतो आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारातही प्रचंड उलाढाल झालेली गेल्या काही दिवसांत दिसते आहे.

Continues below advertisement

Corrtech International IPO: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा सातत्याने जागतिक बाजारांवर होतो आहे. परिणामी भारतीय शेअर बाजारातही प्रचंड उलाढाल झालेली गेल्या काही दिवसांत दिसते आहे. अशातच अनेक कंपन्यां आपले आयपीओ तुर्तास बाजारात आणण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतू तरीही अनेक कंपन्या मात्र आयपीओ आणण्यावर ठाम आहेत. त्यांना विश्वास आहे की, बाजार हा लवकर सावरेल आणि स्थिरता आलेली दिसेल.

Continues below advertisement

अशातच कॉरटेक इंटरनॅशनल ही पाइपलाइन टाकणारी सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी तिचा आयपीओ आणणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, या आयपीओ अंतर्गत 350 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कंपनीच्या प्रवर्तकांकडून 40 लाख शेअर्स विकले जातील.

निधी कुठे वापरला जाईल

या आयपीओमधून मिळणारी रक्कम डिबेंचर्सची पूर्तता आणि कर्ज भरण्यासाठी वापरली जाईल. यासोबतच हा निधी नवीन उपकरणांच्या खरेदीसाठी, कंपनीच्या वाढत्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी भांडवली खर्चासाठी वापरला जाईल.

कंपनीबद्दल माहिती

Corrtech इंटरनॅशनल भारतात हायड्रोकार्बन पाइपलाइन टाकण्याचे काम करते आणि या क्षेत्रातील आघाडीच्या सोल्युशन पुरवठादार कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी तेल आणि गॅस रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये सामग्री आणि फीड हाताळणीसाठी प्रक्रिया सुविधांसाठी EPC सोल्यूशन्स (इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट आणि बांधकाम) देखील प्रदान करते. इक्विरस कॅपिटल ही इश्यूची एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola