नवी दिल्ली : देशातील सर्वात जुन्या खाजगी बँक तामिळनाड मर्केंटाईलचा आयपीओ लवकरच बाजारात येऊ शकतो. याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रं त्यांनी सेबीकडे सादर केली आहेत. यातून बँकेच्या भांडवली गरजा पूर्ण करण्याचा विचार आहे.


आत्ताच्या घडीला मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय निर्देशांक दोन्ही सर्वोच्च पातळीवर आहेत. गुंतवणूकदारांची चांदी झाली असून अनेकविध कंपन्यांकडून उत्तम रिटर्न मिळतायेत. अशातच जवळपास 100 वर्ष जुन्या असलेल्या खाजगी क्षेत्रातील तामिळनाड मर्केंटाइल बँकेने प्रारंभिक शेअर विक्रीद्वारे निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रं सादर केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DHRP) नुसार, आरंभिक सार्वजनिक इश्यू (IPO) मध्ये 1,58,27,495 नवीन इक्विटी शेअर्स आणले जाणार आहेत आणि त्यात भागधारकांना 12,505 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट केली आहे.


विक्री ऑफरमध्ये डी प्रेम पालनिवेल आणि प्रिया राजन यांच्या 5,000 इक्विटी शेअर्स, प्रभाकर महादेव बोबडे यांचे 1,000 इक्विटी शेअर्स, नरसिम्हन कृष्णमूर्ती यांचो 505 इक्विटी शेअर्स आणि एम मल्लिगा राणी आणि सुब्रमण्यम वेंकटेश्वरन अय्यर यांच्या 500 शेअरची विक्री केली जाणार आहे.


सार्वजनिक क्षेत्रातल्या आणखी एका कंपनीचा समभाग केंद्र विकण्याच्या तयारीत, केंद्र सरकार मार्च 2022 पर्यंत मिनी रत्न WAPCOS IPO आणणार


देशातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक


तुतीकोरिन-आधारित बँक आयपीओमधून मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याची योजना आखत आहे. तमिळनाड मर्केंटाइल बँक ही देशातील सर्वात जुनी खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे ज्याचा इतिहास जवळजवळ 100 वर्षांचा आहे.


बँकेचे 41.8 लाख ग्राहक आहेत


मार्केट रेग्युलेटर कडे जमा केलेल्या DRHP नुसार, बँक भविष्यात भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी IPO द्वारे उभारलेल्या पैशांचा वापर करेल. या व्यतिरिक्त, तामिळनाड मर्केंटाइल बँकेच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात शाखा आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत तामिळनाडूमध्ये त्याचे 41.8 लाख ग्राहक आहेत, जे एकूण ग्राहकांच्या 85 टक्के आहेत