Mukesh ambani company stock: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अनेक कंपन्या सध्या शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत. यातील काही कंपन्यांच्या शेअरची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे. अंबानी यांची अशीच एक कंपनी आहे, जिचे मूल्य अवघे 21 रुपये आहे. हॅथवे केबल अँड डेटाकॉम लमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. 


शुक्रवारी शेअरचे मूल्य किती होते?


शुक्रवारी अनेकांनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम लमिटेड या कंपनीचे शेअर खरेदी केले. गुरुवारी (19 सप्टेंबर) हा शेअर 20.95 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी (20 सप्टेंबर) मात्र या शेअरमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. शुक्रवारी हा शेअऱ थेट 21.81 रुपयांपर्यंत गेला होता. शुक्रवारी बाजारा बंद झाला तेव्हा या शेअरचे मूल्य 21.31 रुपये होते. गुरुवारच्या तुलनेत हा शुक्रवारी या शेअरचे मूल्य 1.72 टक्क्यांनी वाढले. 


शेअर बाजारावर 6 फेब्रुवारी 2024 रोजी या शेअरचे मूल्य 27.90 रुपयांपर्यंत वाढले होते. हे मूल्य 52 आठवड्यांतील सर्वाधिक मूल्य होते. ऑक्टोबर 2023 मध्ये या शेअरचे मूल्य 17.01 रुपये होते. हे मूल्य 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य होते.  


कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न कसा आहे?  


हॅथवे केबल अँड डेटाकॉम लमिटेड या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास 75 टक्के शेअर्स हे प्रमोटर्सकडे आहेत. त्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांकडे 25 टक्के हिस्सेदारी आहे. या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीच्या अनेक व्हेंचर्सचा समावेश आहे. यामध्ये जिओ कन्टेंट डिस्ट्रिब्यूशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्यूशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यासह जियो केबल अँड ब्रॉडबँड यांची होल्डिंग आहे. 


कंपनीचा तिमाही निकाल काय आहे? 


हॅथवे केबल अँड डेटाकॉम लमिटेड या कंपनीने नुकतेच आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 18.1 टक्क्यांच्या घसरणीसह 18.32 कोटी रुपये राहिला. गेल्या वर्षी एप्रिल-जून या काशात कंपनीने नफा 22.36 कोटी रुपये होता. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 


हेही वाचा :


बँक खात्याचा 1 लाख, 10 लाख रुपयांचा नियम माहिती आहे का? नियम मोडल्यास येते थेट इन्कम टॅक्स विभागाची नोटीस


पैसे घेऊन राहा तयार, तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा ब्रँड आयपीओ येणार; जाणून घ्या A टू Z माहिती!