LG Electronics: दक्षिण कोरियातील मल्टि नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेली एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) ही कंपनी भारतातही प्रसिद्ध आहे. या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स भारतात आवडीने घेतले जातात. आता याच कंपनीकडून भारतात विस्तारासाठी प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी लवकरच 1.5 अब्ज डॉलर्सचा मोठा आयपीओ घेऊन येणार आहे.


आयपीओचे काम चार मोठ्या बँकांकडे


विशेष म्हणजे या आयपीओसाठी एलजी इलेक्ट्रॉनिक्सने तयारीदेखील चालू केली असून या आयपीओचे काम चार मोठ्या बँकांकडे दिल्याचा दावा केला जात आहे. बँक ऑफ अमेरिका (Bank of America), सिटीग्रुप इंक (Citigroup Inc), जेपी मॉर्गन चेस (JPMorgan Chase) आणि  मॉर्गन स्टेनली (Morgan Stanley) असे या चार बँकिंग संस्थांचे नाव आहे.


1 ते 1.5 अब्ज डॉलर्सचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये येणार


एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया (LG Electronics India) या कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतात आपले स्थान आणखी बळकट व्हावे असा या कंपनीचा प्रयत्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचा आयपीओ आगामी वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकतो. हा आयपीओ आल्यानंतर 1 ते 1.5 अब्ज डॉलर्सचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतात. हा आयपीओ भारतीय शेअर बाजारात आल्यास एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे एकूण मूल्य जवळपास 13 अब्ज डॉलर्स होणार आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार या आयपीओबाबत कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या आयपीओची साईज आणि तारीखदेखील बदलू शकते. मात्र आयपीओसंदर्भात या कंपनीकडून प्रयत्न चालू आहेत. 


पुढच्या महिन्यात आयपीओचे कागदपत्रे सोपवणार


वेगवेगळ्या माध्यमांच्या रिपोर्टनुसार एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओसंदर्भातील कागदपत्रे पुढील महिन्यात भांडवली बाजार नियामक सेबीकडे (SEBI) सोपवणार आहे. लवकरच एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओची देखरेख करण्यासाठी अन्य बँकांनाही सोबत घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ बनली आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने 2030 पर्यंत आपला महसूल 75 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाटी या आयपीओची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. 


हेही वाचा :


टाटा ग्रुपची 'ही' कंपनी देणार तगडे रिटर्न्स, शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केल्यास होणार भरपूर फायदा!


क्रेडिट कार्डने शॉपिंग कराल तर मिळणार बम्पर सूट, वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर्स


'असं' करा आधार मोफत अपडेट; जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!