Investment Plan : तुमच्याकडे असलेल्या पैशांचं तुम्ही योग्य नियोजन (Financial planning) करणं गरजेचं आहे. योग्य नियोजन केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. दरम्यान, तुमच्या गुंतवणुकीवर (Investment) चांगला परतावा देणाऱ्या अनेक योजना आहे. या योजनांमध्ये (Yojana) तुम्ही गुंतवणूक करु शकता. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरु कराल तितक्या लवकर तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही जर मुलगा किंवा मुलगी जन्मल्याबरोबरच योग्य ते आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच जर तुम्ही मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने SIP मध्ये गुंतवणूक केली तर वयाच्या 21 व्या वर्षी मुलं करोडपती होतील. फक्त तुम्हाला 21x10x12 चा फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल. जाणून घेऊयात SIP मध्ये गुंतवणुकीसंदर्भात सविस्तर माहिती.
पैशांच्या गुंतवणुकीसाठी SIP हा एक उत्तम मार्ग
SIP मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर लगेच आर्थिक नियोजन केलं तर त्यांचा चांगला लाभ मिळू शकतो. आत्तापासूनच तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली तर भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला मोठा पैसा उपलब्ध होऊ शकतो. दर महिन्याला तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्याच मोठा परतावा मिळू शकतो.
कसं कराल गुंतवणुकीचं नियोजन?
SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी प्रथम तुम्ही या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावी. त्यानंतरच गुंतवणूक करावी. दरम्यान, SIP द्वारे गुंतवणूक करताना तुम्ही 21x10x12 सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. करोडपती बनण्याचं हे सुत्र आहे. यामध्ये 21 म्हणजे 21 व्या वर्षी, 10 म्हणजे दरमहा 10 हजार रुपयांची SIP आणि तिसरी गोष्ट 12 म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा. जर तुम्ही सलग 21 वर्ष महिना 10000 रुपयांची SIP मध्ये गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळाला तर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी करोडपती होऊ शकता. त्यामुळं तुम्ही जर 21x10x12 या सुत्रानुसार गुंतवणूक केली तर 21 व्या वर्षी 1 कोटींचे मालक होऊ शकता.
21 वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपये परतावा मिळतो
जर तुम्ही सलग 21 वर्ष पैशांची महिना 10000 रुपये याप्रमाणे गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक ही 25.20 लाख रुपये होते. या सर्व गुंतवणुकीवर तुम्हाला 12 टक्क्यांचा परतावा मिळतो. तुमचा 21 वर्षात 88.66 लाख रुपये परतावाच होतो. त्यामुळं वयाच्या 21 व्या वर्षी तुमचा मुलगा किंवा मुलगी 1 कोटी 13 लाख रुपयांची मालक होईल. करोडपती होताना फक्त महिन्या गुंतवणूक करण्याची काळजी घ्यावी लागते. जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या: