Investment News : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व वाढताना दिसत आहे. लोक अनेक ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत आहेत. मात्र, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळतोय का? हे पाहणं गरजेचं आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकासाठी जास्तीचे पैसे गुंतवायचे असतील तर सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे FD. पण FD वर व्याज किती मिळतेय? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात FD वर जास्त परतावा देणाऱ्या 10 मोठ्या बँकांबद्दलची माहिती. या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्याज मिळत आहे. तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 3 वर्षांपर्यंत FD वर 8.05 टक्के व्याज मिळू शकते.
कोणत्या बँकेत FD वर किती मिळतो व्याजदर?
तुम्ही ॲक्सिस बँकेत एफडी केल्यास तुम्हाला 3 वर्षांच्या एफडीवर 7.6 टक्के व्याज मिळेल.
बंधन बँकेत 3 वर्षांची एफडी केल्यास बँक तुम्हाला 7.75 टक्के व्याज देत आहे.
तुम्ही सिटी युनियन बँकेत 3 वर्षांसाठी FD केल्यास बँक तुम्हाला 6.75 टक्के व्याज मिळेल.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि 3 वर्षांसाठी FD करू इच्छित असाल तर तुम्हाला DCB बँकेत FD करण्यावर 8.05 टक्के व्याज मिळेल.
एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँकेत 3 वर्षांची एफडी करणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला 7.5 टक्के व्याज मिळेल.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल ज्यांनी IDFC First Bank मध्ये 3 वर्षांची FD केली असेल तर तुम्हाला 7.3 टक्के व्याज मिळेल.
इंडसइंड बँकेत 3 वर्षांसाठी एफडी करून ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज मिळू शकते.
RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे.
येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्के व्याज देत आहे.