Infosys Q4 : इन्फोसिस (Infosys) कंपनीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कंपनीच्या नफ्यात (Profit) मोठी वाढ झाली आहे. इन्फोसिसने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 30 टक्के वाढीसह 7969 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. 23 वर्षांत प्रथमच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. Infosys ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर 20 रुपयांचा लाभांश जाहीर केलाय.
मागील वर्षीच्या तिमाहीपेक्षा यंदा नफ्यात मोठी वाढ
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023-24 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मोठई वाढ झालीय. कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढलाय. कंपनीचा नफा 7969 कोटी रुपयांवर गेला आहे. तर कंपनीचा महसूल हा 37,923 होता. दरम्यान मागील वर्षीच्या तिमाहीपेक्षा नफ्यात मोठी वाढ झालीय. 2022-2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 6128 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, यावर्षीच्या तिमाहीत नफ्यात मोठई वाढ झाली.
कंपनीच्या भागधारकांसाठी एक दिलासादायक बातमी
दरम्यान, इन्फोसिसच्या भागधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 23-24 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना लाभांश जाहीर करण्यात आलाय. प्रति शेअर 20 रुपयांचा लाभांश जाहीर केलाय. तर गुंतवणूकदारांना 8 रुपयांचा विशेष लाभांश जाहीर करण्यात आलाय.
23 वर्षात प्रथमच इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट
दरम्यान, सर्वात महत्वाचं म्हणजे 23 वर्षात प्रथमच इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झालीय. मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येत 25,994 एवढी मोठी घट झालीय. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ही 25994 एवढी होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.5 टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, सध्या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील वाढ होच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कालच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये 0.34 टक्क्यांची वाढ झाली आहे.
इन्फोसिस ही देशातील सर्वात मोठी दुसरी आयटी कंपनी आहे. या कंपनीची मोठी उलाढाल देखील आहे. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात 1981 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणारी ही कंपनी आहे. 1983 साली कंपनीचे मुख्यालय बंगळूरु येथे हलवण्यात आले होते. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात 30 ठिकाणी कार्यालये आहेत. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच् जाळ असणारी ही कंपनी आहे.
महत्वाच्या बातम्या:
नारायण मूर्तींचा 4 महिन्यांचा नातू बनला देशातील सर्वात तरुण करोडपती, नावावर 15 लाख शेअर्स, शेअर्सची किंमत एकूण व्हाल थक्क