Infosys बंगळुरु: देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आयटी सेवा पुरवणारी कंपनी इन्फोसिसनं चालू आर्धिक वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी 90 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसनं या निर्णयाबाबत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे कळवलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली असेल त्यांना बोनसचा लाभ दिला जाणार आहे.
ET नुसार, बोनसचा फायदा डिलिवरी आणि विक्री क्षेत्रातील मध्यम आणि ज्युनिअर लेवलच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. इन्फोसिसच्या एकूण 3.15 लाख कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना याचा लाभ मिळणार आहे. कंपनीनं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह बोनस दिला जाईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामगिरी प्रमाणं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात बोनस रक्कम मिळेल.
इन्फोसिसनं चांगल्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांचे मानले आभार
इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये दुसऱ्या तिमाहीत कंपनीनं फायदा मिळवल्याची महिती देण्यात आली आहे. या कामगिरीमुळं बाजारमूल्य वाढलं असल्याचं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या क्षमतेमुळं ग्राहकांना चांगल्या सोयी देण्यात मदत होत आहे, सहकार्यासाठी धन्यवाद, असं इन्फोसिसनं म्हटलंय.
इन्फोसिसनं सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत कामगिरी चांगली ठेवली आहे. कंपनीची सप्टेंबरच्या तिमाहीतील कमाई 4.7 टक्क्यांनी वाढून 6506 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूण कमाई 5.1 टक्क्यांनी वाढून 40986 कोटींवर पोहोचली आहे. इन्फोसिसनं 2021-22 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर रोख लावला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीनं मूल्यांकन प्रक्रिया सुरु केली होती. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये वेतन प्रणालीबाबत संशोधन सुरु केलं होतं.
इतर बातम्या :
Zomato चे सीईओ 2026 पर्यंत बिनपगारी काम करणार,दीपिंदर गोयल यांनी असा निर्णय का घेतला? जाणून घ्या
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)