Prince Hassanal Bolkiah : लोकशाही सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणचे राजे, सम्राट, नवाब, सुलतान यांची सत्ता संपुष्टात आली. तोपर्यंत या राजांनी जगावर राज्य केले. दरम्यान, असे काही देश आहेत की, जिथं अजूनही राजेशाही अस्तित्वात आहे. आज आपण अशा एका देशाची आणि सुलतानची (Sultan) माहिती पाहणार आहोत की, ज्यांची संपत्ती आणि समृद्धी इतर श्रीमंत लोकांपेक्षा कितीतरी जास्त आहे. या सुलतानाकडे सोन्याच्या विमानासह (Golden Plane) कितीतरी अलिशान गाड्या, महाल, सोने याची मोठी संपत्ती आहे. जाणून घेऊयात या सुलतानाबद्दल सविस्तर माहिती. 


ब्रुनेई देशाचा सुलतान हसनल बोलकिया ( Prince Hassanal Bolkiah) यांच्याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. जे जगातील सर्वात श्रीमंत राजा म्हणून ओळखले जातात. ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकिया आपल्या संपत्ती आणि समृद्धीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत तेल आणि वायू आहे. 


राहण्यासाठी बांधला सोनेरी महाल 


 सुलतान हसनल बोलकिया यांनी राहण्यासाठी 2250 कोटी रुपयांचा महाल बांधला आहे. या पॅलेसचा घुमट 22 कॅरेट सोन्याने सजवण्यात आला आहे. GQ रिपोर्टनुसार हसनल बोलकियाच्या 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस'ची मूल्यमापन किंमत 2550 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या भव्य पॅलेसमध्ये पाच स्विमिंग पूल आहेत. 257 बाथरुम आणि 1700 हून अधिक खोल्या तसेच 110 गॅरेज आहेत.


स्वत:साठी बनवले सोन्याचे विमान  


सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. त्यांनी स्वत:चे विमान सजवण्यासाठी 3000 कोटी रुपये खर्च केले आहेत. एका रिपोर्टनुसार, सुलतानने त्यांच्या वापरासाठी बोईंग 747 मध्ये अंदाजे 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यापैकी 120 दशलक्ष डॉलर या सोनेरी रंगाच्या विमानाच्या सजावटीसाठी खर्च करण्यात आले होते.


सुलतानकडे जगातील सर्वात दुर्मिळ गाड्यांचा संग्रह


एका अहवालानुसार, ब्रुनेईच्या सुलतानकडे जगातील सर्वात दुर्मिळ गाड्यांचा संग्रह आहे. ज्यामध्ये सोन्याच्या रोल्स-रॉईसचाही समावेश आहे. या संग्रहात, ब्रुनेईच्या 29 व्या सुलतानकडे सुमारे 7000 वाहनांचा मोठा काफिला आहे. ज्यांचे एकूण अंदाजे मूल्य 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यामध्ये 300 फेरारी आणि 500 ​​रोल्स रॉइसचा समावेश आहे. हसनल बोलकिया हे 30 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात. सुलतानने 2017 मध्ये त्याचा 50 वा वर्धापन दिन साजरा केला. ज्यामुळं तो राणी एलिझाबेथ II नंतर इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा करणारा राजा बनला.


महत्वाच्या बातम्या:


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? 'या' दिग्गजांना टाकलं मागे, नेमकी किती आहे संपत्ती?