Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmers) विविध योजना चालवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं, हाच यामागं सरकारचा उद्देश आहे. यातीलच दोन योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि दुसरी किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan yojana). या दोन्ही योजनांचा एकत्रीत लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो का? या दोन्ही योजना नेमक्या काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना


देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचा निधी देते. हा निधी प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्यात दिला जातो. या योजनेची सुरुवात 12 सप्टेंबर, 2019 रोजी झाली होती. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 16 हप्ते देण्यात आले आहेत. आता 17 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. 


प्रधानमंत्री किसान मानधन योजना


दुसरी शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही एक पेन्शन योजना आहे. या अंतर्गत 19,48,871 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 12.8 लाख पुरुष आहेत. तर 7.41 लाख महिला आहेत. या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. वयाची 60 वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे. 


एकाच वेळी दोन योजनेचा लाभ मिळू शकतो


दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असेल तर तुम्ही थेट मानधन योजनेत सामील होऊ शकता. एकाच वेळी तुम्ही या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी तातडीनं कागदपत्रांची पुर्तता करणं गरजेचं आहे. कागदपत्रांची पूर्ता केल्यास तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि दुसरी किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan yojana) या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


PM किसानचा 17 वा हप्ता हवा असेल तर आधी 'हे' काम करा, अन्यथा हप्त्यापासून राहाल वंचित