Ratan Tata News : उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले आहे.  रतन टाटा हे केवळ त्यांच्या व्यवसायासाठीच नव्हे तर त्यांच्या सौम्य स्वभाव, साधेपणा आणि इतरांना मदत करण्यासाठी देखील ओळखले जातात. उद्योग जगापासून ते सोशल मीडिया जगतात रतन टाटा यांचे लाखो चाहते आहेत. व्यस्त जीवन असूनही रतन टाटा खास प्रसंगी सोशल मीडियावर आपले विचार मांडायला विसरत नाहीत. सोशल मीडियावर लाखो लोक रतन टाटा यांना फॉलो करतात, पण रतन टाटा सोशल मीडियावर फार कमी लोकांना फॉलो करतात.


रतन टाटा फक्त एकाच अकाऊंटला फॉलो करतात


रतन टाटा हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय राहत नाहीत, पण खास प्रसंगी त्यांचे म्हणणे आणि मत व्यक्त करण्यास ते विसरत नाहीत. इंस्टाग्रामवर रतन टाटा यांच्या फॉलोअर्सची संख्या 8.5 दशलक्षच्या घरात आहे. आणि ट्विटरवर 12.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.  रतन टाटा फार कमी लोकांना फॉलो करतात. रतन टाटा इंस्टाग्रामवर फक्त एकच प्रोफाईल फॉलो करतात. तर ट्विटरवर फक्त 27 लोकांना फॉलो करतात. त्यामुळे रतन टाटा हे कोणाला फॉलो करतात, याची उत्सुकता आहे. 


रतन टाटा कोणाला फॉलो करतात?


रतन टाटा इंस्टाग्रामवर फक्त एक प्रोफाईल फॉलो करतात. रतन टाटा फक्त टाटा ट्रस्टच्या अकाऊंटला  फॉलो करतात. रतन टाटा त्यांच्या इंस्टाग्रामवर फक्त एक प्रोफाईल फॉलो करतात, ते म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सेवाभावी संस्था आहे. टाटा ट्रस्टचे स्थापना वर्ष 1919 आहे. दुसरीकडे, टाटा ट्रस्टच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ही संस्था 1892 पासून कल्याणकारी कार्यात गुंतलेली आहे. टाटा समूहातील कंपन्यांना होणाऱ्या फायदाचा एक भाग हा टाटा ट्र्स्टला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून कल्याणकारी, धर्मादाय कामे, निधी दिला जातो. त्यामुळे टाटा ट्रस्टला एक वेगळं महत्त्व आहे. 


रतन टाटा सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय राहतात. काही मोजक्या वेळी, प्रसंगी त्यांनी इंन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. रतन टाटा यांच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर 15 जानेवारी रोजी शेवटची पोस्ट केली आहे, या फोटोमध्ये त्यांनी इंडिका कारसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. टाटा इंडिकाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रतन टाटा यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: