इंदौर : भारतात चहाचे शौकीन असणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. आपल्याकडे कॅाफीपेक्षा चहाला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपल्या देशात चहाचा अस्वाद घेतला जात नाही असं एकही घर शोधूनही सापडणार नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन चहाच्या व्यवसाय सुरु करणाऱ्यांची संख्याही आपल्याकडे कमी नाही. इंदौरमधील अनुभव दुबे या तरुणाने आपला आयएएसचा अभ्यास सोडला आणि आनंद नायक या आपल्या मित्रासोबत चहाचा व्यवसाय सुरु केला. आज ते आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत. 


अनुभव दुबे  याच्या शिक्षणातील वाटचाल 
मध्यप्रदेशातील एका खेडेगावात राहणाऱ्या अनुभव दुबे याचे आठवीपर्यंत शिक्षण हे त्याच्या गावातच झालं. पुढील शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी त्याला इंदौर येथे पाठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याची मैत्री आनंद नायक याच्यासोबत झाली. काही काळानंतर आनंदने शिक्षण अर्धवट सोडून आपल्या नातेवाइकासोबत व्यवसाय सुरु केला. दुसरीकडे अनुभव दुबेच्या वडिलांना आपला मुलगा IAS अधिकारी होताना बघायचं होत. त्यासाठी अनुभवला दिल्लीत पाठवण्यात आलं. 


IAS चा अभ्यास बंद अन् चहाचा व्यवसाय सुरु
अनुभवने दिल्लीत राहून IAS ची तयारी सुरु केली. सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला आनंद नायकचा कॅाल आला. आपण दोघे मिळून एखादा बिजनेस सुरु करुया अशी कल्पना आनंदने अनुभवसमोर मांडली. आपण चहाचा व्यवसाय सुरु करुयात ,हा व्यवसाय सुरु करण्यामागचा फायदा असा की आज जगभरात बरेच जण पाण्यापेक्षा चहा घेणं पसंत करतात. शिवाय आपल्या देशातील तरुणांमध्ये चहा अत्यंत लोकप्रियत आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये जास्त पैशांची गुंतवणूक देखील नाही असं मत आनंदने अनुभवसमोर मांडलं. 


इंदौरमध्ये पहिलं दुकान
अनुभव आणि आनंद या दोघांनी मिळून तीन लाखांची गुंतवणूक करुन इंदौरमध्ये पहिले 'चायसुट्टा बार' या नावाने दुकान उघडले. हे दुकान उघडल्यानंतर काही जणांनी त्याचे कौतुक केले तर काही जणांनी त्यांना नावं ठेवली. पण त्यांनी न डगमगता आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखवला. 


आज 'चायसुट्टा बार' या नावाने महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर दुकानांच्या शाखा आहे.आज त्यांचा दिवसाचा गल्ला हा लाखांच्या घरात असून करोडो रुपयांचा फायदा त्यांना होतोय. जवळपास 250 कुटुंबांना ते रोजगार मिळवून देतात आणि 18 लाखापेक्षा जास्त ग्राहक त्यांच्या चहाचे चाहते आहेत.


महत्वाच्या बातम्या :