Maratha Reservation : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे.   लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर काल चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे खासदार गप्प होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की,  मराठा आरक्षणाच्या विधेयकावर भाजप खासदार गप्प का? रावसाहेब दानवे, राणे सभागृहात का बोलले नाहीत. समाजाचा कळवळा बाहेरच का दाखवतात.


Corona Vaccine Certificate : कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? काँग्रेस खा. केतकरांच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर


संजय राऊत म्हणाले की,  सरकारने हा तिढा कायम ठेवला आहे. 50 टक्क्यांची मर्यादा जो पर्यंत उठवली जात नाही तोपर्यंच राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. लोकसभेतल्या सर्व खासदारांनी हिच मागणी केली आहे. मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? जे एकत्र येऊन आंदोलन करत होते त्यांनी या 50 टक्क्यांवर बोलायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले. 


127th Amendment Bill : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर


राऊत म्हणाले की, आतापर्यंत लाखों लोकांनी यासाठी मोर्चे काढले. अनेकांनी आपले प्राण गमावले. हे सर्व चाललंय तो केंद्र सरकारला खेळ वाटतोय का. आम्ही या विधेयकाला समर्थन देतोय. यामध्ये आम्हाला कोणताही अडथळा आणायचा नाही. पण आमची अपेक्षा आहे की सरकारने संवेदनशीलता दाखवून 50 टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी, असं राऊत म्हणाले.


मंत्रालयात सापडलेल्या बाटल्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्या बाटल्या दोन अडीच वर्षे जुन्या आहेत असं मला कळलं. त्यामुळे ही कुणाची झिंग होती. जी अजून उतरली नाही. हे पाहावं लागेल, असं राऊत म्हणाले.