Indigo Airlines Alert : विमान कंपन्यांना सध्या वारंवार धमक्या येत आहेत. आज इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) 20 फ्लाईट्सला (Flight) सिक्युरीटी अलर्ट (Alert) देण्यात आला आहे. सिक्युरीटी अलर्ट आणि फेक कॉल्समुळे मागील काही दिवसात विमान कंपन्यांचे जवळपास 600 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.  22 ऑक्टोबर रोजी देखील इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या तब्बल 13 फ्लाइट्सला सिक्युरीटी अलर्ट देण्यात आला होता. यामुळं विमान कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. 


आज सिक्युरीटी अलर्ट देण्यात आलेल्या 20 फ्लाईट्सला कोणत्या?  


दिल्ली- इस्तानाबुल
मुंबई- इस्तानाबूल
जेद्दाह ते मुंबई
बंगळुरु ते झारसुगुडा
पुणे ते जोधपूर
कोलकाता ते पुणे
हैदराबाद ते बागडोगरा
कोची ते बंगळुरु
कोची ते हैदराबाद
गुवाहाटी ते कोलकाता
दिल्ली ते एझवाल
अहमदाबाद ते लखनऊ
जयपूर ते चेन्नई
गोवा ते कोलकाता
चंदीगड ते अहमदाबाद
गुवाहाटी ते कोलकाता
हैदराबाद ते गोवा
कोलकाता ते हैदराबाद
कोलकाता ते बंगळुरु
बंगळुरु ते कोलकाता 


या सर्व 20  फ्लाईट्सला आज धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं प्रोटोकॉलप्रमाणे प्रवाशांना खाली उतरवत तपासणी करण्यात आल्याची एअरलाइन्स कंपनीची माहिती आहे. सोबतच, सर्व नियमांचे पालन करत एअरलाइन्सनं स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फोलो केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.