मुंबई राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election)  बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसे पक्षाची देखील यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला समोर न येता ठाकरे गटाने थेट यादी जाहीर केली आहे. आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बडे नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. 


 वरळीत आदित्य ठाकरेंची अर्ज दाखल करण्यापूर्वी  भव्य मिरवणूक काढली तर स्वत: स्कूटी चालवत यशोमती ठाकुरांची बाईक रॅली काढण्यात आली.  जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि रोहित पाटलानीही शक्तिप्रदर्शन केले.  तर शंकरबाबा मठात दर्शन घेऊन चंद्रकांत पाटलांची आगेकूच केली आहे. धनंजय मुंडेंचं  पंकजा मुंडेंकडून औक्षण करण्यात आले, संजय बांगर, राधाकृष्ण विखे पाटील, किरण सामंतही अर्ज भरणार आहे 


उमेदवारी अर्ज कुणी कुणी भरले? 



  • चंद्रकांत पाटील (महायुती)

  • छगन भुजबळ (महाविकास आघाडी) 

  • अद्वय हीरे   (महाविकास आघाडी) 

  • रोहित पाटील  (महाविकास आघाडी)

  •  हर्षवर्धन पाटील (महाविकास आघाडी) 

  • संतोष बांगर (महायुती)

  • भागिरथ भालके (अपक्ष)

  • रणजीत शिंदे (अपक्ष)

  • अर्जुन खोतकर (महायुती)

  • अविनाश जाधव (मनसे)

  • धनंजय मुंडे (महायुती)

  • राजन विचारे  (महाविकास आघाडी)

  •  जितेंद्र आव्हाड (महाविकास आघाडी) 

  • राजू पाटील (मनसे)

  • सुलभा गायकवाड (महायुती)

  • वसंत गीते (महाविकास आघाडी) 

  • आदित्य ठाकरे (महाविकास आघाडी)

  •  वैभव नाईक (महाविकास आघाडी) 

  • जयंत पाटील (महाविकास आघाडी) 

  • किरण सामंत (महायुती)

  • अतुल भातखळकर (महायुती)

  • मंगलप्रभात लोढा (महायुती)

  • अमित साटम (महायुती)

  • मिहिर कोटेचा (महायुती)

  • कालिदास कोळंबकर (महायुती)

  • पराग अळवणी (महायुती)

  • विक्रम सावंत (महायुती)

  • सुधीर गाडगीळ (महायुती)

  • सुरेश खाडे (महायुती)

  • सुहास बाबर (महायुती)

  • भास्कर जाधव (महाविकास आघाडी) 

  • योगेश कदम (महायुती)

  • यशोमती ठाकूर (महाविकास आघाडी)

  • बंटी भांगडिया  (महायुती)

  • विनोद अग्रवाल (महायुती)

  • संजय राठोड (महायुती)

  • समरजीत घाटगे (महायुती)

  • दिलिप वळसे पाटील (महायुती)

  • राधाकृष्ण विखे पाटील (महायुती)

  • हीरामण खोसकर (महायुती)

  • माणिकराव कोकाटे (महायुती)

  • नरहरी झिरवळ (महायुती)

  • राणी लंके (महाविकास आघाडी)

  • प्रशांत बंब (महायुती)

  • राजेश टोपे (महाविकास आघाडी)

  • सुभाष देशमुख (महायुती)

  • अमल महाडिक (महायुती)

  • राजेंद्र पाटील यड्रावकर (महायुती)

  • संग्राम थोपटे (महायुती)

  •  अनिल पाटील (महायुती)


हे ही वाचा:


शरद पवार गटाची उमेदवारी मलाच मिळेल, रणजित शिंदेंचा दावा, माढा विधानसभेसाठी भरले दोन अर्ज