Stock Market : सलग आठ दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात नफा बुकिंग दिसून आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 63000 च्या खाली घसरला आहे. व्यवहार संपताना निर्देशांक 415 अंकांच्या घसरणीसह आज 62,868 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 94 अंकांच्या घसरणीसह 19,042 अंकांवर बंद झाला.
आज बाजारात सर्व आघाडीच्या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी या क्षेत्रातील शेअर घसरले. केवळ धातू, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअरर्स देखील वेगाने बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 18 समभाग वाढीसह बंद झाले तर 32 समभाग तोट्यासह बंद झाले. त्यामुळे सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 10 समभाग वाढीसह आणि 20 समभाग तोट्यासह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 0.80 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
वाढलेले शेअर्स
डॉ. रेड्डी 1.18 टक्के, टाटा स्टील 1.13 टक्के, टेक महिंद्रा 1.11 टक्के, इंडसइंड बँक 0.56 टक्के, एचसीएल टेक 0.35 टक्के, भारती एअरटेल 0.29 टक्के, Axis बँक 0.29 टक्के. टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.18 टक्के, एनटीपीसी 0.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
घसरलेले शेअर्स
महिंद्रा अँड महिंद्रा 2.08 टक्के , HUL 1.59टक्के, नेस्ले 1.52टक्के, मारुती सुझुकी 1.52टक्के, HDFC 1.38टक्के, एशियन पेंट्स 1.29टक्के, बजाज फायनान्स 1.13टक्के, पॉवर ग्रिड, सन फार्मा 1.08टक्के आणि ICICI बँक 1.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
कशामुळे घसरला शेअर बाजार?
आज आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या घसरणीसह 60,709 अंकावर खुला झाला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांच्या घसरणीसह 18,066 अंकांवर खुला झाला होता. आज सकाळपासून बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली होती. त्यामुळे भारतीय शेअर बजारा घसरला.
महत्वाच्या बातम्या