Indian Market 5th Place in World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये (World's Top Equity Market) पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं. पण आता अदानी शेअर्सची बाजारातील परिस्थिती सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.
भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर
भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) इक्विटी बाजारांमध्ये (Equity Market) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय बाजार भांडवल मूल्य (India’s Market Capitalization) शुक्रवारी 3.15 ट्रिलियन डॉलर इतके होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बाजाराचे भांडवल मूल्यामध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताच्या मागे फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे. यानंतर ब्रिटन बाजार भांडवल मूल्य सातव्या स्थानावर आहे.
मात्र, एकूण भांडवल मूल्य 6 टक्क्यांनी कमीच
दरम्यान, अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीनंतरही पुन्हा एकदा अदानी समुहाने बाजारात घोडदौड सुरु केल्याने भारत पाचव्या स्थानावर आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारात घसरण झाली होती, तरी याचा जागतिक बाजारातील भारताच्या इक्विटीमध्ये विशेष परिणाम झालेला दिसत नाही. मात्र 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्यापेक्षा आताचं बाजार मूल्यापेक्षा सहा टक्क्यांनी कमी आहे.
अदानी समुहाच्या शेअर्सच्या विक्रीचा परिणाम
गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. पण, अदानी समुहाच्या प्रयत्नामुळे अदानी कंपन्यांना बाजारात पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. याचा भारतीय शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला. 24 जानेवारीपासून अदानी समुहाच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली. सध्याचं भारतीय बाजार भांडवल मूल्यापेक्षा 24 जानेवारी आधी भारतीय बाजाराचे एकूण भांडवल मूल्याहून अद्यापही सहा टक्क्यांनी कमी आहे. मात्र, आपण जागतिक इक्विटी बाजारात पाचव्या स्थानावर कायम आहोत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारातील व्यवहार वाढवण्यासाठी दक्षिण आशियाई देशांचा मोठा वाटा आहे. यासाठी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या बाजाराचा फायदा झाला आहे. मागील दोन वर्षातील दक्षिण आशियाई देशांची भारतीय बाजारात गुंतवणूक वाढली आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत भारत हा जगातील टॉप-5 अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर भारत टॉप-5 इक्विटी बाजारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर भारतीय बाजारातील उलाढालीमुळे फ्रान्स पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. पण फ्रान्सचा हा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही. कारण आता पुन्हा एकदा भारताने इक्विटी बाजारात आपलं पाचवं स्थान कायम मिळवलं आहे.