Women Job News : अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला (Women) काम करताना दिसत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांचा वावर वाढताना दिसतोय. मात्र, अद्याप नोकरीच्या (Job) क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिला कमीच आहेत. देशातील निम्मी लोकसंख्या ही महिलांची असूनही नोकरीच्या क्षेत्रात महिला कमीच आहेत. दरम्यान, महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये महिलांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. फक्त सरकारला GDP चा छोटासा भाग या क्षेत्रात खर्च कारावा लागेल. हा खर्च देशासाठी महिलांसाठी खूप महत्वाचा असणार आहे. यातून अर्थव्यवस्थेला (economy) मोठा फायदा होणाराय.
सरकारनं जीडीपीचा 2 टक्के भाग यावर खर्च केल्यास मोठ्या संधी
महिलांसाठी एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. फक्त सरकारनं जीडीपीचा 2 टक्के भाग यावर खर्च करावा लागेल. 'केअर सेक्टर' असं या क्षेत्राच नाव आहे. जवळपास 70 टक्के महिलांना या क्षेत्रात संधी मिळू शकतात. येणाऱ्या काळात या क्षेत्रासाठी महिलांना मोठी मागणी असणार आहे. कारण या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे.
या क्षेत्रात किती रोजगार निर्माण होणार?
दरम्यान, सरकारनं जर केअर सेक्टर मध्ये लक्ष दिलं तर अर्थवयवस्थेसाठी मोठी चालना देखील मिळणार आहे. कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. दरम्यान, सरकारनं जर केअर सेक्टर मध्ये 2 टक्क्यांची गुंतवणूक केली तर या क्षेत्रात 1.1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जवळपास 70 टक्के महिलांना यामध्ये संधी मिळू शकते. केअर सेक्टरमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा, केअर सेक्टर सबसीडी, कौशल्य विकास, गुंतवणूक यावर भर देणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या: