PM Modi attends SemiconIndia 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सेमीकंडक्टर (Semiconductor) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. देशात सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना भारत 50 टक्के आर्थिक मदत देईल, अशी मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातमध्ये सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्स-2023 (SemiconIndia-2023) मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सेमीकंडक्टर उद्योगासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.


भारत सेमीकंडक्टर हब बनणार!


पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटलं की, जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्या भारताकडे भविष्यातील एक सेमीकंडक्टर हब म्हणून पाहत आहेत. भारत ही संधी हातातून जाऊ देणार नाही. गुजरातमध्ये सेमीकंडक्टर कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, भारतात सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना सरकार 50 टक्के आर्थिक मदत करण्यात येईल.


पाहा व्हिडीओ : नक्की काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 






चिप प्लांटसाठी भारत करणार 50 टक्क्यांची मदत


गांधीनगर येथे आयोजित सेमीकॉन इंडिया या कार्यक्रमाचा उद्देश सेमीकंडक्टर उद्योगावर लक्ष केंद्रित करणं हा आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. 'सेमिकॉन इंडिया 2023' मध्ये सेमीकंडक्टर उद्योगातील दिग्गज पॅनेल चर्चेद्वारे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी पुढे उपलब्ध केल्या जाणार असल्याचं सांगितलं आहे. 






पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा


नेटवर्किंग, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यासारख्या संधींद्वारे सेमीकंडक्टर उद्योगाच्या प्रगतीला गती देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सेमीकॉन इंडिया या कार्यक्रमाला 28 जुलै रोजी सुरुवात झाली असून 30 जुलै रोजी संपेल. या तीन दिवसीय परिषदेदरम्यान, सेमीकंडक्टर चिप, डिस्प्ले फॅब, चिप डिझाइन आणि असेंबलिंग या क्षेत्रातील भारतातील आगामी काळातील संधींसाठी त्यांचे ज्ञान आणि दृष्टीकोन मांडण्यासाठी जगभरातून तज्ज्ञ एकत्र आले आहेत.