Top 3 earning states : कमाईच्या बाबतीत आपला देश कोणत्या क्रमांकावर आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, आता प्रश्न असा आहे की, या शर्यतीत भारतातील (India) कोणती राज्ये आघाडीवर आहे? एका सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या राज्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये तुमच्या राज्याची स्थिती काय? याबाबतची माहिती दिली आहे.  


सरकारी आणि निमसरकारी संस्थांनी राबवलेल्या विविध योजनांमुळं लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न वाढले आहे. कुटुंबाच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होतोना दिसत आहे. दरम्यान, कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त कमावतात आणि भारतीयांची सरासरी कमाई किती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.


या राज्यातील लोक सर्वाधिक पैसा कमावतात


कर्नाटक, महाराष्ट्र आणि चंदीगड ही तीन राज्ये पैसा कमावण्यात आघाडीवर आहेत. या तीन राजयांतील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कमावत्या लोकांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कुटुंबातील सदस्यांची सरासरी संख्या 4.2 होती, ती यंदा 4.3 झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि चंदीगड ही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी राज्ये आहेत. गतवर्षी महाराष्ट्र उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल होता, मात्र यंदा कर्नाटकने या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात बिहार, झारखंड आणि ओडिशा कमाईच्या बाबतीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे आहेत. सध्या तरी बिहार हे सर्वात कमी उत्पन्न मिळवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.


भारतीयांचे सरासरी उत्पन्न किती?


व्यक्ती आणि कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच या सर्वेक्षणात उत्तरेकडील राज्यांमध्ये संकोच, स्वार्थ आणि भागीदारीचा अभाव असल्याचेही समोर आले आहे. इतर राज्यांकडून शिकण्याची आणि त्यांच्याकडून सहकार्य घेण्याची ही एक संधी आहे. जेणेकरुन या प्रवासात सुधारणा आणि प्रचार करता येईल. 2022 च्या आकडेवारीनुसार, भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न 25,910 रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या 23,000 रुपयांपेक्षा सुमारे 10 टक्क्यांनी अधिक आहे.


2022 मध्ये भारतीय कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न हे 23 000 रुपये होते. ते आता म्हणजे 2023 मध्ये 25,910 रुपये झाले आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर कर्नाटक आणि चंदीगडचा क्रमांक लागतो. कर्नाटक 2023 मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या राज्यातील सरासरी कमाई ही 35,411 रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


एका महिन्यात कमावले 650 कोटी, जाणून घ्या कोण आहे रेखा झुनझुनवाला?