Layoffs in India: कोरोना महामारीच्या काळात जसे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी 'कॉस्ट कटिंग'च्या नावाखाली नोकर कपातीचा धडाका लावला होता. त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आता कुठे थोडी स्थिरता दिसत असताना टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात केली असून तब्बल 52000 नोकरदार घरी बसले आहेत. कंपन्यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालातून ही आकडेवारी समोर आली असून टाटा, रिलायन्स, रेमंड, स्पेन्सर अशा नावाजलेल्या कंपन्यांनी हजारो कामगारांची नोकर कपात केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात केवळ रिटेल क्षेत्रात ५२ हजार नोकरदारांनी काम गमावलं होतं. सर्वाधिक कर्मचारी कपत यंदा रिलायन्स रिटेलने केल्याचं दिसून येत आहे. 38 हजार 29 जणांना कामावरून कमी कले आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रिलायन्स रिटेल ही देशांतर्गत किरकोळ बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या अहवालानुसार त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात 22 हजार 564 झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 4217 ने कमी आहे.
या कंपन्यांनी वाढवले कर्मचारी
एकीकडे रिलायन्स, स्पेन्सरसारख्या बड्या कंपन्यांनी नोकरकपाट करत असताना दुसरीकडे डीमार्ट, टाटा, व्ही मार्ट या कंपन्यांनी कर्मचारी वाढवले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 19,716 होती, जी 2023-24 मध्ये 29]275 एवढी झाली आहे. व्हीमार्टनेही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून 9,333 वरून 10,935 पर्यंत वाढवली आहे.
नक्की कशामुळे करण्यात आली नोकरकपात?
मागणीचा जोर ओसरल्याने किरकोळ क्षेत्रावर सध्या मोठ्या प्रमाणात कपातीची वेळ आली आहे. वर्षभरात आघाडीच्या कंपन्यांनी तब्बल 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कर्मचारी कपात केली आहे. लाइफस्टाईल, ग्रॉसरी रिटेलर्स आणि रेस्टॉरंटने मागील वर्षाच्या तुलनेत २६ हजार कर्मचारी कमी केले आहेत. विक्रेत्यांकडे एकूण ४.५५ लाख कर्मचारी होते. ही संख्या वर्षभरात ४.२९ लाखांवर आली आहे. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार किरकोळ क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या स्टोअरर्सचा विस्तार ९ टक्क्यांनी केलाय. हा दर मागील पाच वर्षांचा निचांक ठरला आहे.