India Oil Import From Russia: भारत (India) जगातील अनेक देशांकडून विविध वस्तूंची आयात (Import) करत असतो. यामध्ये सगळ्यात जास्त आयात ही तेलाची होते. कारण भारतात तेलाचं उत्पादन कमी (India Oil Production) प्रमाणात होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात देशाची तेलाची गरज ही आयातीतून पूर्ण केली जाते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुार, सध्या भारतानं स्वस्त दरात रशियाकडून तेलाची आयात केली आहे. यामुळं भारताची 8 अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे.   


देशात मोठ्या प्रमाणात कच्च्या पेट्रोलियमची आयात


मिळालेल्या माहितीनुसार, देशात मोठ्या प्रमाणात कच्च्या पेट्रोलियमची आयात केली जाते. गेल्या 11 महिन्यात कच्च्या तेलाची आयात ही 2 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचा परिणाम आयात बिलावरही दिसून आला आहे. दरम्यान, रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणं भाजपसाठी फायद्याचे ठरत आहे. कारण रशियाकडून कमी दरानं तेलाची आयात केली जात आहे.  यामुळं देशाची चालू खात्यातील तूट कमी करण्यास मदत होत आहे. 


एप्रिलमध्ये 13 ते 17 टक्क्यांची वाढ  


मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली आहे. या देशाच्या तुलनेत इराक आणि सौदी अरेबियातून कमी आयात करण्यात आली आहे. मात्र, रशियाकडू मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये 13 ते 17 टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर इराकमधून तेलाची आयात 20 ते 23 टक्क्यांनी घटल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे.


जगात भारत तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली जाते. जगात भारत हा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केल्याचा फायदा इतर देशांनाही होत आहे. दर नियंत्रणात आहेत. त्यामुळं तेलाची खरेदी करणं शक्य होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाची आयात ही  2 टक्क्यांवरुन 36 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर पश्चिम आशियाई देश (सौदी अरेबिया), संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत येथून आयात 23 टक्क्यांवर आली आहे. पूर्वी ही आयात 34 टक्के होती.


दरम्यान, भारत तेलासाठी परकीय देशाच्या आयातीवरील अवलंबत्व कमी करत आहे. देशात तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात देशात तेलाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Oil palm plantation : 11 राज्यांमध्ये 3 हजार 500 हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल उत्पादन वाढवण्यावर भर