India exports rice to Bangladesh : बांगलादेशातील (Bangladesh) सत्तापालटानंतर शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी आपला देश सोडला आणि भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ सुरुच आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार, मंदिरांची विध्वंस, जाळपोळ अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, अशा हिंसेच्या आगीत पेटलेल्या बांगलादेशला भारताने पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बांगलादेशला भारतातून 27 हजार टन तांदूळ पाठवण्यात आला आहे. भारतातून बांगलादेशला 2 लाख टन तांदूळ निर्यात करण्यात येणार आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारने भारतातून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तांदळाची ही पहिली खेप चितगाव बंदरातून बांगलादेशात पोहोचली आहे. भारताकडून 200,000 टन तांदूळ खरेदी करणे हा कराराचा हा भाग आहे. बांगलादेशमध्ये सध्या तांदळाची कमतरता नाही, परंतु अलीकडील गंभीर पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तांदळाची उपलब्धता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं तांदळाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
शून्य आयात शुल्कावर तांदूळ पाठवला जात आहे
200,000 टन तांदळाच्या आयातीबरोबरच, बांगलादेशचे अंतरिम सरकार निविदाद्वारे 100,000 टन तांदूळ देखील आयात करेल. भारतातून आणखी तांदूळ आयात करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, देशातील तांदळाच्या किंमतीत स्थिरता आणण्यासाठी त्याच्या आयातीवरील सर्व करही मागे घेण्यात आले आहेत. म्हणजे बांगलादेश भारताकडून शून्य आयात शुल्कावर तांदूळ आयात करत आहे. बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने आधीच बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बांगलादेशात 5 ऑगस्टच्या गोंधळात टाकलेल्या बदलांनंतरही मला वाटते की आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी पूर्ण प्रामाणिकपणे चर्चा केली आहे.
बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचा सध्या आयातीवरील खर्च वाढला आहे. मात्र, दुसरीकडे त्या तुलनेत निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे व्यापार तूट सातत्याने वाढत आहे. आयातीवर अधिक डॉलर खर्च करावे लागत आहे, निर्यातीच्या तुलनेत परकीय चलन मिळालेले नाही, त्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी होत आहे. त्यामुळं सध्या बांगलादेश मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Bangladesh Crisis: बांगलादेश श्रीलंकेच्या वाटेवर! पाच महिने पुरेल इतकाच परकीय चलन साठा शिल्लक