Petrol and Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (crude oil price) प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर गेल्या आहेत. भू-राजकीय तणावामुळं या किंमती कमी होण्याची शक्यता नाही. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमती काही दिवसांत प्रति बॅरल 85 डॉलरच्या वर जाऊ शकतात. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होणार का? हा सवाल उपस्थित केला जातोय. 


अमेरिकन कच्च्या तेलात किंमतीत प्रति बॅरल 7 डॉलरची वाढ 


दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून आखाती तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 6 डॉलरची वाढ झाली आहे. तर अमेरिकन कच्च्या तेलात किंमतीत प्रति बॅरल 7 डॉलरची वाढ झाली आहे. अशा स्थितीत आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळं भारतातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता असल्याचे वास्तव तेल विपणन कंपन्यांनी स्वतः मान्य केलं आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडं तेल कंपन्यांचा पेट्रोलवरील नफा कमी झाला आहे. तर डिझेलवर प्रतिलिटर तीन रुपयांचा तोटा होत आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रथमच 8 फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल  80 डॉलरच्या वर दिसली होती. तेव्हापासून ही किंमत 80 डॉलरच्या वर राहिली आहे. सध्या ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83.47 डॉलर आहे. दुसरीकडं, अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 8 फेब्रुवारीपासून अमेरिकन तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरपेक्षा जास्त आहे. सध्या अमेरिकन तेलाची किंमत प्रति बॅरल 79.19 डॉलर आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरील कर कमी केला होता.


महत्वाच्या बातम्या:


पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का? नेमकी परिस्थिती काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर