Income Tax Filing : आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे. 


नियमांनुसार, डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते. 


दरम्यान, आयकर विभागाने एका ट्वीटमध्ये म्हटले की, मंगळवार 28 डिसेंबरपर्यंत 4.86 कोटी ITR भरण्यात आले आहे. वर्ष 2021-22साठी आयकर विवरण दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण 5.95 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. मागील वर्षी इतके आयटीआर दाखल होण्यासाठी अद्याप सुमारे 9 लाख अर्ज भरले जाणे अपेक्षित आहे. तीन दिवसांत आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख तीन दिवसात संपणार आहे. 


ITR पोर्टलविरोधात असंतोष


आर्थिक वर्ष 2020-21 करीता आयकर विवरणपत्र दाखल  (Income Tax Return filing)करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात असंतोष वाढत आहे. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला. केंद्र सरकारने याआधी Income Tax Return दाखल करण्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha