Investment Plan : पैसे गुंतवण्यासाठी (Investment) बँक एफडी (Bank FD) हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैशांची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा. FD मध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही. एफडीमधील गुंतवणूक ही 100 टक्के सुरक्षित आहे. त्याचवेळी, एफडीमध्ये मिळणारा परतावा देखील निश्चित केला जातो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. दरम्यान, FD करताना कोणत्या बँकेत किती व्याजदर मिळतो याबाबतची माहिती मिळवणं गरजेचं आहे.
तुम्हीही तुमचे पैसे FD मध्ये गुंतवणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील 5 मोठ्या बँकांच्या FD व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि 8 टक्के दराने परतावा मिळवू शकता. FD मध्ये केलेली पैशांची गुंतवणूक ही सुरक्षीत मानली जाते. यावर परतावा देखील चांगला मिळतो. मात्र FD मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या बँकेत किती परतावा मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना खूप चांगले व्याजदर देते. कोटक महिंद्रा बँकेच्या एफडीमध्ये सामान्य नागरिकांना 2.75 टक्के ते 7.40 टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.25 टक्के ते 8.14 टक्के आहे.
ॲक्सिस बँक
Axis Bank FD मध्ये सामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.25 टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD व्याजदर 3.50 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया देखील एफडीमध्ये खूप चांगले परतावा देते. या बँकेत सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 3.50 ते 7 टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD व्याजदर 4 टक्के ते 7.50 टक्क्यांपर्यंत आहे.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना खूप चांगले व्याज दर देते. एचडीएफसी बँक एफडीमध्ये सामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.40 टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के ते 7.90 टक्के आहे.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँक FD मध्ये गुंतवणूक करणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. या बँकेत सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.25 टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के ते 7.85 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या: