मुंबई : भारतासह जगभरात एसयूव्ही कारला मोठी मागणी आहे. म्हणूनच कार उत्पादक या सेगमेंटमध्ये सर्व प्रकारच्या कार तयार करत आहेत. आता कंपन्या मायक्रो एसयूव्ही कार बनवत आहेत. दक्षिण कोरियन ऑटो दिग्गज कंपनी ह्युंदाईने आपली नवीन मायक्रो एसयूव्ही कॅस्पर (Hyundai Casper) त्यांच्या देशात लाँच केली आहे. 


काय आहेत कॅस्परचे फीचर्स? 


ह्युंदाई कॅस्पर नवीन इंटीरियर लेआउटसह सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे तिचा लूक आकर्षक आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक एसी, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोलसह नॅचरल लँगवेज रिकग्नेशन, 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 4.2-इंच एलसीडी अशी अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी स्टँडर्ड आणि हाय-टेक ड्रायव्हर सपोर्ट सिस्टीम व्यतिरिक्त, कॅस्परमध्ये सात एअरबॅग देखील देण्यात आल्या आहेत. 


ह्युंदाय कॅस्पर 3,595mm लांब, 1,595mm रुंद आणि 1,575mm उंच असेल. ही कार ह्युंदायची सर्वात छोटी कार असलेल्या सँट्रो हॅचबॅकपेक्षा थोडी उंच असेल. कॅस्परमध्ये 1.2-लीटर, फोर-सिलेंडर एस्पिरेटेड इंजिन दिले जाईल जे ग्रँड आय 10 Nios पॉवर देतं. कोरियन कारमेकरने या कारची किंमत कमी ठेवण्यासाठी सॅन्ट्रोच्या 1.1-लीटर, थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह मायक्रो-एसयूव्हीचे लोअर व्हेरिएंट्सदेखील सादर करण्याची तयारी केली आहे.


ह्युंदाय कॅस्परचा थेट प्रतिस्पर्धी टाटा एचबीएक्स मायक्रो-एसयूव्ही ही कार असेल. याव्यतिरिक्त, यास मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा केयूव्ही 100 सारख्या काही हाय रायडिंग हॅचबॅककडूनदेखील स्पर्धेला सामोरे जावे लागेल.


कारची किंमत आणि स्पर्धा


ह्युंदाईच्या या मायक्रो एसयूव्ही कारची  किंमत 8.64 लाख रुपये आहे. कंपनी लवकरच ही कार भारतात लॉन्च करू शकते. अद्याप कंपनीने कार कधी लाँच होणार याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र ही कार जर कार भारतात लॉन्च झाली तर ती थेट टाटा पंच या कारशी स्पर्धा करेल. टाटाच्या या मिनी एसयूव्हीचीही जोरदार चर्चा सुरू आहे.